नंदुरबार : अचानक वीज प्रवाह सुरू झाला आणि ….

नंदुरबार : अचानक वीज प्रवाह सुरू झाला आणि ….

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने वीज खांबावरून कोसळून एकजण गंभीर जखमी झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे दुर्घटना घडली असून दरम्यान याप्रकरणी दोन वीज कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि. १७) रोजी सायंकाळी ६ वा. काठीचा मंदिरपाडा येथील इलेक्ट्रीक डीपी जवळ ओल्या पोहल्या वळवी (वय- ४८, धंदा- शेती रा. काठीचा मंदिरपाडा ता. अक्कलकुवा) यांचा मुलगा गुमानसिंग ओल्या वळवी (वय- २४) हा उभा असताना वायरमन आमश्या गोरजी वसावे (रा. पिंपरापाणी ता. अक्कलकुवा) याने इलेक्ट्रीक डीपीवर चढण्यास सांगितले. परंतु काम सुरु असतानाच ऑपरेटर (मोलगी एमएसईबी) विनायक गाढे याने अचानक विदयुत प्रवाह सुरू केला त्यामुळे विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने गुमानसिंग गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत गुमान सिंग याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुमान सिंग यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात दोन्ही वीज कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस सब इन्सपेक्टर मुकेश पवार करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news