Nandurbar Crime | नंदुरबारमध्ये अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक पर्दाफाश; संशयिताकडून 300 हून अधिक व्हिडिओ क्लिप्स जप्त

मोबाईलमधील एका गुप्त फोल्डरमध्ये अल्पवयीन मुले आणि युवकांशी संबंधित लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ व छायाचित्रे आढळून आली
Crime  News
Crime NewsAI Photo
Published on
Updated on

Minor Exploitation Case

नंदुरबार : अल्पवयीन बालके आणि युवकांचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ व छायाचित्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या मोबाईलमधून सुमारे ३०० व्हिडिओ क्लिप्स आणि छायाचित्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे नंदुरबार शहरात खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाचा माग काढत कारवाई केली. प्राथमिक तपासात संशयित तरुण २०२२ पासून अल्पवयीन मुले तसेच समवयस्क युवकांना लक्ष्य करीत असल्याचे समोर आले आहे. पैशांचे आमिष दाखवून तसेच सलगी वाढवून तो पीडितांचे लैंगिक शोषण करीत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या कृत्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे मोबाईलमध्ये साठवून ठेवत तसेच ती सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत पीडितांवर दबाव आणला जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime  News
Nandurbar News : नंदुरबार ऑडिओ क्लिप प्रकरण : भाजप नेते विजय चौधरी यांच्या माजी स्वीय सहाय्यकाला जामीन मंजूर

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

काही दिवसांपूर्वी संशयिताच्या गैरकृत्यांची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरालगतच्या भोणे फाटा परिसरातील एका शेतात संशयित एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी बोलावणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने विशेष पथक तयार करून घटनास्थळी पाठविण्यात आले.

पोलिस पथकाने योग्य संधी साधत घटनास्थळी संशयिताला ताब्यात घेतले. त्याची ओळख चेतन प्रकाश कोळी (वय २२, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) अशी पटली.

Crime  News
Nandurbar News | डबक्यात बुडून एकाच वेळी तीन कोवळ्या बालकांचा मृत्यू; अक्कलकुव्याच्या दुर्गम भागातील घटना

मोबाईल तपासणीत धक्कादायक डिजिटल पुरावे

संशयिताला नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पंच आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्याच्या मोबाईलची कायदेशीर तपासणी करण्यात आली. मोबाईलमधील एका गुप्त फोल्डरमध्ये अल्पवयीन मुले आणि युवकांशी संबंधित लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ व छायाचित्रे आढळून आली.

फॉरेन्सिक पथकाने हे डिजिटल पुरावे वैज्ञानिक पद्धतीने जतन केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मोबाईलमधून सुमारे ३०० व्हिडिओ क्लिप्स आणि छायाचित्रे मिळाली आहेत. या प्रकरणातील पीडितांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.

गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे यांनी सरकारतर्फे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ आणि बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करीत असून, आणखी पीडित किंवा या प्रकरणाशी संबंधित अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

Crime  News
Nandurbar News: नंदुरबारमध्ये कत्तलखान्यांवरून खडाजंगी, पालिकेत भाजप विरुद्ध शिंदे गट आमनेसामने; हिंदुत्वावरून आरोप-प्रत्यारोप

पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, हेकॉ. जगदीश पाटील, पोकॉ. रुपेश पगारे, राजेंद्र कटक, अमित भरवाड, आनंदा मराठे आणि महिला पोलीस कर्मचारी निवा वाघमोडे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणाची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news