Nandurbar fraud News | बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

fraud
fraud

नंदुरबार : खापर येथील हॉटेल चालकाची ६७ लाखांना फसवणूक झाल्याचे प्रकरण ताजे असताना, शेअर्स खरेदी-विक्रीच्या बनावट ॲपच्या माध्यमातून शहरातील एका व्यापाऱ्याला सुमारे ११ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे.

व्यापारी पवनकुमार गोपीचंद मुलचंदाणी (३६, रा. गुरूनानक सोसायटी तळोदा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. १८ मे ते ६ जून २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. ते गुंतवणुकीची माहिती घेत असताना जीएफएसएल सिक्युरीटी ऑफिशिअल नावाच्या व्हॉटस्अप ग्रुप अॅडमिनने त्यांना जीएफएसएल नावाचे शेअर्स ट्रेडिंगचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. केवायसी केल्यानंतर त्यांना शेअर्स खरेदीसाठी एक लाख रुपये भरलेत. अॅपमध्ये त्यांना माेठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे दर्शविण्यात आल्याने त्यांनी वेळोवेळी १३ लाख १८ हजार रुपयांची गुंतवणूक केली. शेयर्सविक्री पोटी काही रक्कम परत करुन त्यांना अधिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. दरम्यान, त्यांना हा एकूणच फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजल्याने त्यांनी अॅपद्वारे शेयर्स विक्रीचा प्रयत्न केला असता अॅपच बंद पडले. त्यानंतर त्यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठत फिर्याद नाेंदवली. प्रभारी पोलिस निरीक्षक शाम निकम हे तपास करीत आहे.

हेही  वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news