Nandurbar Bribe Case : अडीच लाखांची लाच घेताना शहादा पंचायत समितीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Nandurbar Bribe Case : ‘अनुकूल’ अभिप्राय देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी
Nandurbar Bribe Case : अडीच लाखांची लाच घेताना शहादा पंचायत समितीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
Published on
Updated on

नंदुरबार : भ्रष्टाचाराच्या चौकशीत तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना शहादा पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक अभियंता अभिजित गोवर्धन भावसार (वय ४३) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. सोमवारी (दि. २३) शहादा येथील एका हॉटेलजवळ ही धडक कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार व्यक्ती शहादा तालुक्यातील काथर्देदिगर येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होती. त्यांच्यावर जुलै २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, ज्याची चौकशी शहादा पंचायत समितीमार्फत सुरू होती. या चौकशीचा प्राथमिक अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) सादर करण्यात आला होता, मात्र तो 'मोघम' असल्याने त्यावर स्पष्ट अभिप्राय मागवण्यात आला होता.

Nandurbar Bribe Case : अडीच लाखांची लाच घेताना शहादा पंचायत समितीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
Nandurbar Crime | सोशल मीडियावरील ओळख भोवली: दहापट रकमेच्या आमिषाने प्राणघातक हल्ला; चौघे जखमी, ६ जणांना अटक

लाचेची मागणी आणि सापळा

या चौकशीचे कामकाज कनिष्ठ अभियंता अभिजित भावसार पाहत होते. आपल्या बाजूने स्पष्ट अभिप्राय असलेला अहवाल पाठवण्यासाठी तक्रारदाराने भावसार यांची भेट घेतली. यावेळी भावसार यांनी 'गटविकास अधिकाऱ्यांसमोर दप्तर तपासून तुमच्या बाजूने निकाल लावतो' असे आमिष दाखवून २ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

Nandurbar Bribe Case : अडीच लाखांची लाच घेताना शहादा पंचायत समितीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
Nandurbar Bribe | PWD च्या उपअभियंत्याला ८ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार, २३ फेब्रुवारी रोजी शहादा येथील 'हॉटेल स्पाईस अँड ग्रिल' जवळ सापळा रचण्यात आला. ही लाचेची रक्कम स्वीकारताना भावसार यांना पथकाने जाळ्यात पकडले.

Nandurbar Bribe Case : अडीच लाखांची लाच घेताना शहादा पंचायत समितीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
Nandurbar Crime | बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश; नंदुरबारमध्ये वकिलासह पाच जण अटकेत

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे आणि नंदुरबारचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक विकास लोंढे, विलास पाटील, हेमंतकुमार महाले, देवराम गावीत, विजय ठाकरे, संदीप खंडारे, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले आणि सुभाष पावरा यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news