Kirit Somaiya | अक्कलकुवा मदरसा प्रकरणी किरीट सोमय्या यांची नंदुरबारला अचानक भेट; राष्ट्रीय तपास यंत्रणांना माहिती देणार
kirit somaiya akkalkuwa madrasa nandurbar investigation visit
नंदुरबार - विदेशी फंड आणि विदेशी नागरिकांचे वास्तव्य या संदर्भाने सध्या वादग्रस्त बनलेल्या अक्कलकुवा येथील जामीया इस्लामिया शिक्षण संस्थेच्या मदरशाची भाजपानेते किरीट सोमय्या यांनी आज नंदुरबारमध्ये येऊन माहीती घेतली. दिल्लीला जाऊन राष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणांना ही माहिती दिली जाईल; असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. यामुळे अक्कलकुव्यातील हे प्रकरण आता देश स्तरावर गाजणार असे स्पष्ट झाले.
या संस्थेला आजपर्यंत कोणत्या विदेशातून फंड मिळत राहिले, त्याचा विनियोग नेमका कुठे झाला, देश विदेशातून मुस्लिम विद्यार्थी हजारोच्या संख्येने अक्कलकुवा सारख्या दुर्गम ठिकाणी येतात कसे; या संदर्भाने दिल्लीतील तपासणी यंत्रणांना तपास करायला सांगू असे किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
येमेन येथील नागरीकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे चर्चेत आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा येथील जामीया शिक्षण संस्थेची माहीती घेण्यासाठी भाजपानेते किरीट सोमय्या आज नंदुरबारमध्ये आले होते. त्यांनी प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. कारवाईची माहीती घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचीही भेट घेतली दुपारनंतर अक्कलकुव्याला भेट दिली.
यानंतर माध्यमांशी बोलतांना तपासात काही तरी बिग थिंग मिसींग असल्याचे सांगत उद्या मी दिल्लीत जाणार असून मोठ्या तपास यंत्रणेच्या अधिकाऱयांना भेटून या संस्थेच्या संपुर्ण चौकशीची मागणी करणार आहे. नंदुरबार सारख्या छोट्याश्या जिल्ह्यातील एका तालुक्यात कार्यरत असलेल्या जामीया शिक्षण संस्थेच्या कार्यपद्धती, तिथे येणारा निधी. त्याचे विदेशी संस्थाचे असलेला संबंध , या ठिकाणी येणारे विद्यार्थी त्यांना मिळणार पैसा, यात होत असलेल्या नियमांच्या भंग याचा तपास करण्यासाठीच आपण आल्याचे यावेळी बोलतांना सोमय्या म्हणाले आहेत. या संस्थेला शेकडो करोडचा निधी आला आहे. आता सातशे करोडहून अधिक निधीची माहीती मिळाली असल्याचे सांगत याच अनुशंगाने हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

