Illegal Liquor Seizure Nandurbar: नंदुरबारमध्ये अवैध दारूचा मोठा साठा जप्त; २३२ पेट्यांसह वाहने ताब्यात

स्थानिक गुन्हा शाखेची धडाकेबाज कारवाई; सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे आरोपी ताब्यात
Illegal Liquor Seizure Nandurbar
Illegal Liquor Seizure NandurbarPudhari
Published on
Updated on

नंदुरबार : अवैध विदेशी दारूनी भरलेली दोन वाहने पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले असून वाहनांसह सुमारे 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशी केली जात आहे.

Illegal Liquor Seizure Nandurbar
Nandurbar Municipal Election: नंदुरबारमध्ये भाजपाचा विजय रोखण्यासाठी ‘वोट जिहाद’; डॉ. हिना गावित यांचा आरोप

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना दि.24/12/2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बऱ्हाणपूर - अंकलेश्वर मार्गाने गुजरात राज्यात एका पांढऱ्या रंगाच्या विना नंबरच्या टाटा कंपनीच्या 407 मॉडेल या वाहनामध्ये विनापास विदेशी दारुची वाहतुक होणार असून त्या वाहनाला पांढऱ्या रंगाची सुजूकी व्हॅगनर पायलटींग करणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करण्यास सांगितले.

Illegal Liquor Seizure Nandurbar
Surupsingh Naik Passes Away : आदिवासी नेतृत्वाचा मजबूत आधारस्तंभ कोसळला; सुरुपसिंग नाईक यांचे निधन

त्यानुसार पथक रवाना होऊन महामार्गावरील विशिष्ट ठिकाणी दबा धरून बसले. संशयास्पद वाहन आढळल्यावर बॅटरीचा इशारा देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन सोडून काही जण पळून गेले. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या वॅगनर क्रमांक MP 09 ZB 3104 वरील चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव इरफान असलम खान, वय 38 वर्षे, रा. खलवाडी मोहल्ला, सेंधवा, ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश असं सांगितलं. त्याचप्रमाणे विना क्रमांकाचे 407 मॉडेल चारचाकी वाहनावरील इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राकेश इंदारामजी मेघवाल, वय 30 वर्षे, रा. बोराळी, ता. शिरपूर जि.धुळे असे सांगीतले.

Illegal Liquor Seizure Nandurbar
Nandurbar Municipal Election Result: नंदुरबार जिल्ह्यात सत्तासमीकरण बदलले; दोन पालिकांवर राष्ट्रवादी, नंदुरबारला शिंदे गट, शहाद्यात आघाडीचा झेंडा

सदर वाहनांची तपासणी करता त्यामध्ये एकुण 23,38,560/- रुपये किमतीच्या विदेशी दारुच्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांचे 58 खाकी रंगाचे खोके, एका खोक्यात 04 पेटया अशा एकुण 232 पेटया व दोनवाहने असा एकूण 40,38,560/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. त्याअन्वये वरील इसमांविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Liquor Seizure Nandurbar
Nandurbar Election News : कुणाल वसावे आणि ज्योती राजपूत विजयी

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ दादाभाई मासुळ, महेंद्र नगराळे, मोहन ढमढेरे, पोना/चेतन साळवे, पोका शोएब शेख अशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news