Nandurbar Fraud Case | नंदुरबारमध्ये खळबळ : विजयकुमार गावीत यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून ९ कोटींचा निधी वळविला; माजी आ. शिरीष चौधरीसह ४ जणांविरुद्ध गुन्हा

माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या नावाचे कथित बनावट लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी वापरून शासनाची दिशाभूल
Former MLA Shirish Chaudhary Fraud FIR
Former MLA Shirish Chaudhary Pudhari
Published on
Updated on

Former MLA Shirish Chaudhary Fraud FIR

नंदुरबार : माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या नावाचे कथित बनावट लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी वापरून शासनाची दिशाभूल करत सुमारे ९ कोटी रुपयांचा मंजूर निधी अन्य कामांकडे वळविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉ. विजयकुमार गावीत यांच्या नंदुरबार शहर भाजप कार्यालयाचे प्रमुख अशोक शिवाजी बेहेरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Former MLA Shirish Chaudhary Fraud FIR
Nandurbar Liquor Seized | बंद जिनिंग प्रेसमध्ये आढळला कोटींचा अवैध मद्यसाठा; म्हसावद पोलिसांच्या छापेमारीनंतर खळबळ

तक्रारीनुसार, डॉ. विजयकुमार गावीत हे २०२२ ते २०२४ या कालावधीत आदिवासी विकास मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील विविध समाजांच्या सभागृहांसह मंदिरांच्या कामांसाठी शासनाकडे निधीची शिफारस करून मंजुरी मिळवून दिली होती. मात्र, ते आजारी असलेल्या काळात १८ ऑगस्ट २०२५ ते २ एप्रिल २०२६ दरम्यान माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, माजी नगरसेवक गौरव प्रकाश चौधरी, नयन दिलीप चौधरी, अकाउंटंट किशोर तुळशिराम पाटील (रा. रनाळे) तसेच इतर अज्ञात व्यक्तींनी डॉ. गावीत यांच्या नावाचे चार कथित बनावट लेटरहेड तयार केले.

तसेच, त्या लेटरहेडवर डॉ. गावीत यांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्या करून संबंधित कागदपत्रे मंत्रालयात सादर करण्यात आली. त्याआधारे विविध सभागृह व मंदिरांसाठी मंजूर झालेला सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी अन्य कामांसाठी वळवून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा तसेच स्वतःचा आर्थिक व राजकीय फायदा करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Former MLA Shirish Chaudhary Fraud FIR
Nandurbar Crime | गो- तस्करांना पकडल्यानंतर दोन जमाव भिडले; दगडफेक करीत वाहन फोडले, प्राणघातक हल्ल्यात ५ जण गंभीर जखमी

या तक्रारीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भाटू पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news