जळगावातील मधुकर साखर कारखान्याची होणार विक्री; जिल्हा बँकेने दिली मंजुरी

मधुकर कारखाना जळगाव,www.pudhari.news
मधुकर कारखाना जळगाव,www.pudhari.news

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेने ताब्यात घेतलेल्या मधुकर साखर कारखान्याच्या विक्रीवर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला असून त्यास संचालकांनी सर्वानुमते मंजूरी दिली असल्याची माहिती चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा बँकेने ताब्यात घेतलेल्या मधुकर साखर कारखाना व जे.टी. महाजन सुतगिरणीची मागील महिन्यात विक्री करण्यात आली होती. मात्र त्यावेळी मधुकर कारखान्याच्या विक्रीचा अंतीम निर्णय दि. १० तारखेपर्यंत तहकुब करण्यात आला होता. आज संचालक मंडळाच्या बैठकीत पुन्हा मधुकर कारखाना विक्रीवर चर्चा करण्यात आली. तब्बल दीड तासांच्या चर्चेनंतर मधुकर कारखाना विक्रीला संचालक मंडळाने सर्वानुमते मंजूरी दिली. हा कारखाना मुंबई येथील इंडीया बायो अ‍ॅण्ड ग्रो या कंपनीने खरेदी केला असून, संबधित कंपनीला ६३ कोटींची पुर्ण रक्कम तीन महिन्यात जिल्हा बँकेकडे जमा करण्याचा सूचना दिल्या असल्याचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

एनपीए कमी होणार…
जिल्हा बँकेने जे.टी.महाजन सुतगिरणी व मसाका विक्री करून, एकूण ७० कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. बँकेचा संचित तोटा ९७ कोटी इतका आहे. ही रक्कम संचित तोट्यात ७० कोटींची रक्कम टाकल्यास संचित तोटा २७ कोटींवर येणार असून एनपीए देखिल कमी होणार असल्याचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news