कृषी महोत्सव : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त बाइक रॅली

नाशिक : राज्य सरकारचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या कृषी महोत्सवाच्या पूर्व संध्येला पूर्वदिनी काढण्यात आलेली दुचाकी रॅली.
नाशिक : राज्य सरकारचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या कृषी महोत्सवाच्या पूर्व संध्येला पूर्वदिनी काढण्यात आलेली दुचाकी रॅली.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून (दि. 6) गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर कृषी महोत्सव होणार असून, महोत्सवाच्या पूर्वदिनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त 'तृणधान्य पिकांना प्रोत्साहन' अशी संकल्पना या महोत्सवासाठी घेण्यात आली आहे. सोमवारी प्रादेशिक कृषी विस्तार व व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या आवारातून या रॅलीला सुरुवात झाली. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. वाघ यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीस सुरुवात झाली. पौष्टिक तृणधान्य, फळे आणि भाजीपाला यांचे महत्त्व दर्शविणार्‍या घोषवाक्यांचे फलक रॅलीमध्ये दर्शविण्यात आले होते. रॅलीसाठी भगर असोसिएशनचे सहकार्य लाभले. असोसिएशनचे महेंद्र छोरिया, उमेश वैष्णव, नटवर बोरा, पारस साकला, पंकज चोरडिया, सुनील चोरडिया, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, नोडल अधिकारी सुनील वानखेडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news