कांदिवलीत मनसे, काँग्रेसला खिंडार, पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश | पुढारी

कांदिवलीत मनसे, काँग्रेसला खिंडार, पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश

मालाड, पुढारी वृत्तसेवा : उत्तर मुंबईचे काँग्रेसचे सचिव विनायक पाटील आणि मनसेचे राज्य सचिव अश्विन धनावडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. कांदिवली गणेश नगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते व उत्तर मुंबई काँग्रेस सचिव विनायक पाटील आणि मनसेचे राज्य सचिव अश्विन धनावडे यांनी पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला.

अॅड.अजय पाटील, तसेच आदिवासी समाजातील स्थानिक कार्यकर्ते संतोष वर्ते, धर्मेश वर्ते यांच्यासह मुस्लिम समाजातील सय्यद वजीर, मौलाना अखलाक शेख, सय्यद बशीर, अडव्होकेट कलाम शेख, महिला कार्यकर्त्या आरती देवनार आणि मोहसीना शेख यांनीही त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे, चारकोप विधानसभा प्रमुख संतोष राणे माजी नगरसेविका शुभदा गुडेकर, यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला.

विनायक पाटील हे चारकोप कांदिवलीतील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची कन्या अश्विनी धनावडे गणेश नगर येथे नगरसेविका होती. तसेच मनसेचे राज्य सचिव अश्विन धनावडे यांचा ही जनसामान्यांशी सतत संपर्क असल्याने मनसेला व काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. स्थानिक आदिवासी कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील मान्यवरांनी ही प्रवेश केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मजबुती मिळणार आहे.

हेही वाचा

Back to top button