जळगांव : पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; नदीपात्रात फेकला मृतदेह

अवघ्या काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश !
young man Murder due to money dispute
पैशाच्या वादातून तरुणाची हत्याFile Photo
Published on
Updated on

जळगांव : जळगावातील तरूणाला जंगलात मारून पुर्णा नदीपात्रात मृतदेह फेकून दिल्याची घटना मुक्ताईनगरमध्ये घडली आहे. त्या तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढून अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक केली.

image-fallback
पाकच्या पेशावरमध्ये शीख तरुणाची निर्घृण हत्या

पैशाच्या वादातून तरुणाचा खून

मुक्ताईनगर येथे पैशाच्या वादातून तरुणाचा खून झाल्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 19 जुलै 2024 रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमरास सचिन साहेबराव पाटील यांनी साक्ष दिली की, त्याचा भाऊ नितीन साहेबराव पाटील (वय 26) यांच्याकडे डोलारखेडा फाटा येथे त्याच्या मित्र वैभव गोकुळ कोळी(रा. आसोदा. जळगाव) हा उसनवार दिलेले पैसे घेण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत संतोष भागवत कठोरे (रा. बोदवड, ता. मुक्ताईनगर) होता. नितीनचा वैभव आणि संतोष यांच्याशी पैशाच्या कारणावरून वाद झाला. या वादातून नितीन पाटील यांच्यावर त्या दोघांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खुन केला. व त्याचा मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिला.

image-fallback
२० वर्षीय तरुणाची हत्या | पुढारी

काही तासातच आराेपी ताब्यात

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोटी आणि पाणबुड्याचा सहाय्याने पुर्णा नदीच्या पात्रात शोध सुरू केला. पोलिसांना मृतदेह नदिपात्रात सापडला. मुक्ताईनगर पोलिसांनी आरोपी वैभव कोळी आणि संतोष कठोरे यांना काही तासातच ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहे. सदरचा गुन्हा डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगांव, अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शन आणि सूचनेनुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस हवालदार लीलाधर भोई, राजकुमार चव्हाण, पोलीस नाईक मोतीलाल बोरसे, विजय पढार, प्रदीप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कोळी, प्रशांत चौधरी, रवींद्र धनगर, सागर सावे, अनिल देवरे, प्रदीप देशमुख, विशाल पवार, ईश्वर पाटील, चालक सहा.फौ. शेख यांनी केलेली आहे.

image-fallback
पत्नी, दोन मुलींची हत्या करून तरुणाची आत्महत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news