२० वर्षीय तरुणाची हत्या | पुढारी

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

जुन्या वैमनस्यातून चाकूने भोकसून एका युवकाची  हत्या केल्याची घटना राजापेठ ठाणे हद्दीतील जेवड नगरात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमन  खंडारे असून त्याचे वय २० वर्षे आहे. 

दोन तरूणांकडून ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे या घटनेनंतर इरवीन रुग्णालयात नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news