जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्नी ठार; पती गंभीर

अजिंठा चौकात परिसरातील घटना
Jalgaon accident news
अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
Published on
Updated on

जळगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी (दि.९) पहाटे तीनच्या सुमारास शहरातील अजिंठा चौकात घडली. अनिता सुनील राणे (वय ५२, रा. सदगुरुनगर, जळगाव) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की, महिलेचे डोकं थेट धडापासून वेगळे झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon accident news
यवतमाळ : देवदर्शनाला जाताना भीषण अपघात; दाम्पत्य ठार, आठ जखमी

याबाबत अधिक माहिती अशी, अनिता राणे या बुधवारी पहाटे पती सुनील बाबुराव राणे यांच्यासोबत सदगुरुनगरातून दुचाकीने रिंगरोड भागात बांधकाम सुरु असलेल्या त्यांच्या घराकडे निघाल्या होत्या. अजिंठा चौकातून दुचाकीने जात असताना समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने राणे दांम्पत्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत अनिता राणे यांचे डोकं थेट धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती सुनील राणे हेही या अपघातात गंभीर जखमी झाले. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यालगत कोणीही नव्हते, त्यामुळे दांम्पत्याला उडविणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. एका रिक्षा चालकाला अपघात झाल्याचे कळल्यानंतर याबाबत त्याने एमआयडीसी पोलिसांना कळविले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon accident news
हिवरा फाट्यावर दुचाकीच्या अपघातात एकजण ठार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news