हिवरा फाट्यावर दुचाकीच्या अपघातात एकजण ठार

चारचाकीने धडक दिल्याने पघात
Road Accident News
दुचाकीच्या अपघातात एकजण ठार File Photo
Published on
Updated on

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि.5) अपघात झाला. या अपघातात किशन गणपतराव कदम यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी ६ वाजता चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.

Road Accident News
यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा अपघात

नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर हिवरा फाटा येथे सायंकाळी सहा वाजता किशन गणपतराव कदम राहणार हिवरा हे आपल्या दुचाकीने हिंगोलीकडून गावाकडे जात होते. यावेळी हिवरा पाटीवर दुचाकी गावाच्या दिशेने घेत असताना त्यांना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी गाडी क्रमांक (एमएच २६ सीएच ११६२) यांनी पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमध्ये त्यांच्या डोक्याला जबर धक्का लागला. यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने अर्धापूरकडे घेऊन जात असताना मृत्यू झाला.

Road Accident News
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ली जवळ अपघात; दोघे गंभीर जखमी

अपघाताची माहिती कळतात डोंगरकडा पोलीस चौकीची जमादार नागोराव बाबळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. डोंगरकडा येथील आनंद अडकिने यांनी अपघात स्थळी जाऊन अपघातातील रुग्णांना रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली व वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news