जळगाव बसस्थानकावर महिलांचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन महिलांना अटक

जळगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
Jalgaon Crime News
जळगाव बसस्थानकावर महिलांचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन महिलांना अटकFile Photo
Published on
Updated on

Two women who were stealing mangalsutras from women at the Jalgaon bus stand have been arrested

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत बुलढाणा जिल्ह्यातील दोन महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Jalgaon Crime News
Jalgaon Municipal Corporation : जळगावमध्ये ५६ जणांची माघार; शिवसेनेची ‘हॅट्रिक’, भाजपचेही खाते उघडले; ​बिनविरोध निवडीचा धडाका

गर्दीचा फायदा घेऊन करायच्या चोरी

गेल्या महिना-दीड महिन्यापासून जळगाव बसस्थानकावर बसमध्ये चढताना महिलांची मंगळसूत्रे आणि पोत चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचा सापळा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास चक्र फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने पळासखेडा (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील दोन माया दहिमल भोसले उर्फ माया उदय पवार (वय २० वर्षे), अंकिता अर्जुन पवार (वय ३५ वर्षे) संशयित महिलांना ताब्यात घेतले.

Jalgaon Crime News
Crime News : दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

पोलिसांनी या महिलांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी जळगाव बसस्थानकावर गेल्या दीड महिन्यात दोन वेळा महिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली. या कबुलीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची (BNS ३०३ (२)) उकल झाली असून चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन्ही महिलांना पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, रवी नरवाडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news