

A notorious criminal who committed burglaries during the day has been arrested
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे भरदिवसा घरफोड्या झाल्या होत्या. या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 35 ग्रॅम वजनाचे एक लाख 97 हजार रुपयाचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्याच्याकडून पाच घरफोड्या उघडकीस आलेल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहुर पोलीस स्टेशन हददीत ३ डिसेंबर २०२५ रोजी मौजे तोंडपुर गावात तसेच पहुर गावामध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी अज्ञात आरोपीने दिवसाच्या वेळी घरफोडी केल्या होत्या. या विषयी पहुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पहुर पोलीस स्टेशन यांचे तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकिस आणणच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तपासादरम्यान गोपनिय माहिती काढुन तसेच तांत्रीक तपासाचा आधार घेवुन आरोपी किशोर तेजराव वायाळ रा.मेरा बु.ता. चिखली, जि. बुलढाणा याने सदरचे गुन्हे केल्याची निष्पन्न झाले.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन एका ठिकाणी वास्तव्यास नसतो. तपास पथकाने आरोपीच्या दोन दिवस मागावर राहुन त्याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हयाची कबुली दिली व काही मुददेमाल हा संभाजीनगर येथे तर काही मुददेमाल हा चिखली येथे विकल्याची कबुली दिल्याने त्याप्रमाणे एकुण ३५ ग्रॅम सोने किंमत १ लाख ९७ हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस ३ जानेवारी रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
आरोपी किशोर तेजराव वायाळ हा घरफोडीच्या गुन्हयातील अटटल व सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी जळगांव, छ. संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, वाशीम, बुलढाणा, अकोला विविध ठिकाणी गुन्हे दाखल असुन सदर गुन्हयाचे तपासामध्ये त्याने जळगांव तसेच धुळे जिल्हयामध्ये आणखी घरफोड्या केल्याचे कबुल केले आहे.
उघाडकीस आलेले गुन्हे :- १) पहूर पोलीस स्टेशन गुर क्र. ३३०/२०२५ बीएनएस पेन ३०५,३
२)) पहूर पोलिस स्टेशन गुर क्रमांक ३३१/२०२५ बीएनएस पेन ३०५,३३१.
३) जामनेर पोलिस स्टेशन गुर क्रमांक ४४३/२०२५ बीएनएस पेन ३०५,३३१
४) सिंदखेडा पोलीस स्टेशन (जि. धुळे):-३०५/२०२५ BNS कलम ३०५,३३१
५) सिंदखेडा पोलीस स्टेशन (जि.धुळे):-३१५/२०२५ BNS कलम ३०५,३३१
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी , अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बापु रोहम, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पहुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि. प्रमोद कठोरे, पोउपनिरी शेखर डोमाळे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास पहुर पोलीस स्टेशन करीत आहे.