'TWJ असोसिएट्स'चा जळगावकरांना २३ कोटींचा चुना

तक्रार देणाराच निघाला महाठग; २७९ गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणाऱ्या मिलिंद पाटीलला बेड्या
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अवाढव्य परतावा देण्याचे आमिष दाखवून जळगाव जिल्ह्यातील २७९ जणांना तब्बल २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी 'TWJ असोसिएट्स' या कंपनीच्या कारनाम्याऱ्याचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, ज्याने या प्रकरणी पोलिसांत अर्ज दिला होता, तोच मिलिंद शालिकराव पाटील या घोटाळ्याचा स्थानिक 'मास्टरमाईंड' आणि कमिशन एजंट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Fraud
Jalgaon Fraud | जळगाव LCB चा दणका! ५ लाखांच्या बदल्यात २५ लाखांचे आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद

पुणे येथील मुख्य कार्यालय असलेल्या 'TWJ असोसिएट्स प्रा.लि.' आणि 'TWJ इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपन्यांनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात जळगाव शहरासह जिल्ह्यात आपले जाळे पसरवले होते. कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांनी स्थानिक हस्तक मिलिंद पाटील याच्या माध्यमातून जागोजागी सेमिनार आयोजित केले. "आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दरमहा बक्कळ परतावा मिळवा," असे स्वप्न दाखवून सामान्य लोकांची दिशाभूल करण्यात आली. सेबीच्या (SEBI) नियमांची पायमल्ली करत ११ महिने मुदतीचे बेकायदेशीर 'डिपॉझिट' स्किम्स राबवून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले.

Fraud
Chandrapur Railway Job Fraud | रेल्वे नोकरीच्या आमिषाने 2.17 कोटींची फसवणूक; चंद्रपूरसह पाच जिल्ह्यांतील 26 जणांना गंडा

सुरुवातीला मिलिंद पाटील याने आपणही फसवणूक झाल्याचे भासवून पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने जेव्हा सखोल चौकशी केली. तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. पाटील हा केवळ गुंतवणूकदार नव्हता, तर तो जळगाव शाखेचा 'फ्रेंचायझी' चालक होता. त्याने गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून त्यांना बनावट करारनामे करून दिले होते. आणि त्या बदल्यात स्वतः कोट्यवधींचे कमिशन लाटले होते.

Fraud
Chhatrapati Sambhajinagar crime : तलाठी भरतीचे आमिष : दोघांना ६५ लाखाला गंडा

अखेर भरत रतीलाल पवार (रा. पाळधी) यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कलमे ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ६१(२) भारतीय न्याय संहिता २०२३ सह 'बड्स' ॲक्ट कलम २१, २३. गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटीलला अटक करण्यात आली आहे. याचे कारनामे केवळ जळगावपुरते मर्यादित नाहीत. समीर आणि नेहा नार्वेकर या दांपत्यावर यवतमाळ, चिपळूण, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजी नगर अशा विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ठाणे पोलिसांनी यापूर्वीच त्यांना अटक केली असून सध्या ते नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. जळगाव पोलीस लवकरच त्यांचा ताबा घेणार आहेत.

Fraud
Jalgaon Fraud | जळगाव LCB चा दणका! ५ लाखांच्या बदल्यात २५ लाखांचे आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फड, रवींद्र परदेशी, विकास पहुरकर यांच्या पथकाने केली. 'TWJ' कंपनीत ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी त्वरित आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news