Chhatrapati Sambhajinagar crime : तलाठी भरतीचे आमिष : दोघांना ६५ लाखाला गंडा

एकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी
Crime News
Crimepudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : तलाठी भरतीत नोकरीच्या आमिष दाखवत दोघांना ६५ लाख रुपयांचा गंडा घालणारा भामटा मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये लपून बसला होता. ही माहिती मिळताच सिडको पोलिसांनी थेट जबलपूरमध्ये शोध मोहीम राबवून त्याला अखेर बेड्या ठोकल्या. सोमवारी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. विशाल रामसिंग परदेशी (रा. पवननगर, एन ९), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

निवृत्त कर्मचारी शंकर पंडित दुसाने हे फिर्यादी आहेत. १६ मे २०२५ रोजी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात परदेशीच्या एका साथीदाराला अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र, तेव्हापासून विशालचा पोलिसांना थांगपत्ता लागत नव्हता. नुकते विशाल हा जबलपूरमध्ये लपून बसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड यांच्या तांत्रिक तपासादरम्यान समोर आले. गायकवाड यांनी पथकासह जबलपूर गाठले आणि विशालला ताब्यात घेतले.

Crime News
Gadchiroli Fraud Case : नोकरीचे आमिष दाखवून शहीद जवानाच्या मुलाची २ कोटींनी फसवणूक, आरोपीस पुणे जिल्ह्यातून अटक

दुसाने यांना दोन मुले, एक विवाहित मुलगी आहे. त्यांच्या जावयाने विशाल हा तलाठी भरतीत नोकरी लावून देण्याचे काम करीत असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यावरून विशालसोबत बैठक झाली. दोन्ही मुलांसाठी प्रत्येकी २५ लाख, असे एकूण ५० लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेत फिक्स डिपॉझिट (एफडी) म्हणून ठेवण्यात आली. मात्र, निवड यादीत दुसानेंच्या दोन्ही मुलांची नावे नव्हती.

Crime News
Nashik Fraud Case | नोकरीचे आमिष दाखवून ९८ लाखांची फसवणूक

दुसाने यांनी बँकेतील पैशांची माहिती घेतली असता आरोपी विशालने पतसंस्थेचा अध्यक्ष रत्नाकर जोशी याच्या मदतीने ती रक्कम आधीच लाटली होती. असाच प्रकार श्रीकांत पाखरे यांच्यासोबतही घडला होता. त्यांचे १५ लाख रुपये त्याने लंपास केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news