Jalgaon Accident | भरधाव डंपरने दुचाकीवरील तिघांना उडविले; तरुण ठार, २ जखमी

Jalgaon Nashirabad Road | जळगाव - नशिराबाद रोडवरील राणे हॉटेलजवळ घटना
 Accident News
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

Jalgaon Nashirabad Road Dumper hits Bike

जळगाव : जळगाव ते नशिराबाद रोडवरील राणे हॉटेल जवळ आज (दि. १५) दुपारी सव्वातीनच्या सुमारास एका भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगात आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील रहिवासी तेजस युवराज बिऱ्हाडे (वय २२) हा त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे (वय १९) आणि मित्र अजय अफलातून सपकाळे (वय २२) यांच्यासोबत आज दुपारी ३.१५ सुमारास दुचाकीवरून नशिराबादहून जळगावकडे येत होता. त्याचवेळी जळगावकडून नशिराबादकडे जाणाऱ्या एका भरधाव डंपरने अचानक विरुद्ध दिशेने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तेजस बिऱ्हाडे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ तुषार बिऱ्हाडे आणि मित्र अजय सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले.

 Accident News
जळगाव : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून वृद्धाने संपवलं जीवन

या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच तेजस आणि तुषार यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच आक्रोश केला.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अपघात घडवणारा डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 Accident News
Weather Alert Jalgaon | जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news