जळगाव
वृद्धाने स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली.Pudhari News Network

जळगाव : गावठी कट्ट्यातून गोळी झाडून वृद्धाने संपवलं जीवन

वृद्धाकडे गावठी कट्टा आला कुठून ; तपास सुरू
Published on

जळगाव (भुसावळ) : गंगाराम प्लॉट परिसरातील नमस्कार मंडळाजवळ राहणाऱ्या ५२ वर्षीय डिगंबर बढे यांनी स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.12) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावठी कट्टा त्यांच्या हातात कुठून आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डिगंबर बढे हे भुसावळमधील एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कार्यरत होते. सोमवारी (दि.12) रोजी सकाळी त्यांची पत्नी, मुलगी आणि जावई दीपनगर येथे गेले होते. त्याच दरम्यान, त्यांनी घरात एकटे असताना स्वतःवर गोळी झाडली. गोळी झाडल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिस निरीक्षक राहुल वाघ आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. डिगंबर बढे यांच्याकडे गावठी कट्टा कसा आणि कुठून आला? तो कोणी दिला? त्यांनी तो विकत घेतला की अन्य मार्गाने मिळवला? हे प्रश्न अनुत्तरीत असून पोलिस तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news