

जळगाव : प्रांजल खेवलकर यांचा तपास पोलीस नाही तर रूपाली चाकणकर या करीत आहे, असे दिसून येत आहे. अश्या स्वरूपाचे आरोप या महिला आयोगाच्या अध्यक्ष करीत आहे. रूपालाताई आणि रोहिणी ताई यांचे मैत्रीपुर्वीचे काय संबंध आहे हे सर्वांना माहित आहे. त्यांनी सत्य बोलावं, पण याबाबत मी जावयाचं समर्थन करणारा नाही परंतू ही चौकशी एसआयटी कशी करू शकते. ही सीबीआयने चौकशी करावी पण पोलीसांनी सांगावं की याबाबत या महिलेची तक्रार आहे किंवा दुसऱ्या कुणाची तक्रार आहे.
प्रांजल खेवलकर यांचे प्रायव्हेट जीवन आहे. यामध्ये बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही. तुम्हाला काही सांगायचं असेल तर रितसर तक्रार देवून सांगा. अस बेछुटपणे बोलणं अत्यंत घातक आहे. तो माझा जावई असो की कुणी इतर असो, त्याला शिक्षा दिली पाहिजे. पण बदनाम करण्याचे काम विरोधकांनी करून नये. या संदर्भात तक्रार असेल तर पोलीसांनी पत्रकार परिषद घ्यावी, त्यांच्या मोबाईलमध्ये अश्लिल फोटो व्हिडीओ आहे की नाही हा पोलीसांचा चौकशीचा भाग आहे. परंतू रूपाली चाकणकर यांना हे कसं माहित पडलं. अश्लिल व्हिडीओ मोबाईलमध्ये असेल तर ते पोलीसांनी सांगावं ना, रूपाली चाकणकर यांनी का सांगावं.
पोलीसांनी रितसर गुन्हा दाखल करून सांगाव. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कुणालाही यावर बोलण्याचा अधिकार नाही. रूपालीताईनी प्रफुल्ल लोढा आणि नाशिकच्या प्रकरणात लक्ष घालावं, महाराष्ट्रात जे काही महिलांवर अत्याचार होत असेल त्याकडे लक्ष द्यावं. सर्व बाजूनी ही चौकशी करावी असे वक्तव्य एकनाथ खडसे माजी मंत्री राष्ट्रवादी शरद पवार गट नेते यांनी माध्यमांशी बोलताना केले.
दोन महिन्यापासून सरकारवर आम्ही हल्ला करतोय त्यामुळे रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्याचे उपद्वाप सरकारचे चालू आहे माझ्या जावयाने जर असं केलं असेल तर मला लाज वाटेल, तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जावई याला फाशी देखील झाली तर मी त्याच समर्थन करणार नाही. असा नालायक प्रकार करणारा जावई मला नको आहे. खडसे म्हणाले, गिरीश महाजन प्रफुल लोढा या प्रकरणावर बोला एसआयटी मार्फत कशाला चौकशी करतात सीबीआय मार्फत करावी. आम्हाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र सुद्धा सुरू आहे.