Raksha Khadse | निवडणूक हरली की संविधानाचा बागुलबुवा; आधी आत्मपरीक्षण करा : रक्षा खडसेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

‘खडसेमुक्त जिल्हा बँक’ करण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील घेऊ शकत नाहीत
EVM Fraud Claims
Raksha Khadse Pudhari
Published on: 
Updated on: 

EVM Fraud Claims

जळगाव : निवडणुकीत पराभवाची चिन्हे दिसू लागली की निवडणूक आयोगावर आरोप करायचे आणि संविधानाच्या नावाने जनतेची दिशाभूल करायची, हा काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांचा ठरलेला प्रकार असल्याची टीका केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केली. निवडणूक प्रक्रिया किंवा ईव्हीएममध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेत घोळ असेल, तर तामिळनाडूत काँग्रेस आघाडीचे सरकार कसे आले?’ असा सवाल त्यांनी केला. निवडणूक आयोगाला संविधानाने स्वायत्त अधिकार दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश असताना विरोधकांना विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप करणे योग्य नाही, असेही खडसे म्हणाल्या.

EVM Fraud Claims
Jalgaon Bribe News : जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला २५ हजारांची लाच घेताना पकडले!

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर काँग्रेसला सवाल

काँग्रेसकडून निवडणूक आयोग आणि भाजपवर ‘व्होट चोरी’चे आरोप केले जात असल्याचा उल्लेख करून खडसे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘संविधान बदलणार’ अशी भीती निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न झाला. आता मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप केले जात आहेत.

मतदार नोंदणी आणि मतदार यादीच्या प्रक्रियेत पक्षांच्या प्रतिनिधींना आक्षेप नोंदविण्याची संधी दिली जाते. काँग्रेसच्या प्रतिनिधींनी या प्रक्रियेदरम्यान किती अधिकृत हरकती नोंदवल्या, त्याची आकडेवारी जाहीर करावी, असे आव्हान त्यांनी दिले. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळातील निवडणूक आयोगाच्या कामकाजाचा इतिहास तपासावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

EVM Fraud Claims
Jalgaon News: गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांनी दिला नकार; रागाच्या भरात 12 वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

‘आधी शेतकऱ्यांच्या बांधावर जा’

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेलाही रक्षा खडसे यांनी प्रत्युत्तर दिले. सध्या जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गंभीर असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असे त्या म्हणाल्या.

जिल्हा बँकेची निवडणूक डिसेंबरमध्ये झाली तर आम्ही समोरासमोर लढू. ‘खडसेमुक्त जिल्हा बँक’ करण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील घेऊ शकत नाहीत; तो निर्णय बँकेचे सभासद घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या तीन ठरावांवर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला असून, या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

EVM Fraud Claims
Jalgaon News : आदिवासींच्या मागण्यांवर प्रशासनाची यशस्वी शिष्टाई; आठ दिवसांनंतर उपोषण अखेर मागे!

‘घराणेशाही’च्या आरोपावरूनही पलटवार

घराणेशाहीच्या आरोपांवरूनही खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहावे, असे त्या म्हणाल्या. मुक्ताईनगर पालिकेतील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी पाटील यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.

आपल्या नावाने कोथळी, घोडसगाव आणि कर्की येथून ठराव झाल्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. कोथळी येथे माझे घर, घोडसगाव येथे शेती असून कर्की येथे नातेवाईक आहेत. स्थानिक संस्थांनी आग्रहाने ठराव केले असून, आपण कोणत्याही पदाचा गैरवापर केलेला नाही, असा दावा त्यांनी केला.

मंत्रिपदावर नसतानाही यंत्रणेवर दबाव आणणाऱ्यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नयेत. आपण काय बोलतो आणि प्रत्यक्षात काय करतो, याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे, असा टोला खडसे यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news