

Pre Monsoon Rain Impact in Agriculture Jalgaon
जळगाव: जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे 255 गावांमधील 5 हजार 284 शेतकऱ्यांचे ४०१६.१५ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला, केळी, पपई, फळपिकांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे.
चाळीसगाव पंधरा गावांमध्ये 110 शेतकरी बाधित असून 72 हेक्टर वरील केळी व फळपिके, पाचोरा 84 गावांमधील 1015 शेतकऱ्यांचे 745.35 हेक्टर वरील केळी पपई फळपिके , जळगाव दहा गावांमधील 55 शेतकऱ्यांचे 33.70 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. भुसावळ तालुक्यातील दोन गावातील सात शेतकऱ्यांचे 3.40 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
रावेर तालुक्यात एका गावातील आठ शेतकऱ्यांचे सहा हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यातील दोन गावांतील चार शेतकऱ्यांचे १.८० हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. धरणगाव सहा गावांमधील 40 शेतकऱ्यांचे 23 हेक्टर वरील केळी फळपिके यांचे नुकसान झाले आहे. एरंडोल तालुक्यात 65 गावांमधील 1964 शेतकऱ्यांचे 1872.40 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. पारोळा तालुक्यातील 14 गावांमधील 78 शेतकऱ्यांचे 24.40 हेक्टरी पिकांचे नुकसान झाले. जामनेर तालुक्यात आठ गावांमधील 159 शेतकऱ्यांचे 77 हेक्टरी नुकसान झाले आहे. भडगाव तालुक्यातील 48 गावांतील 844 शेतकऱ्यांचे ११५७.१० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये एरंडोल तालुक्यात केळी 488.40 पपई 73.90 फळपिके 1297.10 असे 1872.40 हेक्टर, भडगाव तालुक्यातील केळी 966 पपई 8.60 फळपिके 182.50 असे 1157.10 हेक्टर, पाचोरा तालुक्यातील केळी 340.75 पपई 34.50 फळपिके 363.10 असे 745.35 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.