Prakash Ambedkar | देशातील घराणेशाही संपवा व लोकशाही टिकवा : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | देशातील घराणेशाही संपवा व लोकशाही टिकवा : प्रकाश आंबेडकर
Published on
Updated on

जळगाव- देशातील भाजपा, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या व इतर पक्षांनी धनगर, माळी, भटक्या विमुक्त जातीचे उमेदवारी दिली नाही. त्यांनी नात्यागोत्यांच्या उमेदवारांना उमेदवारी दिली. म्हणजे इकडची सत्ता गेली तरी तिकडची सत्ता आहेच. घरात सत्ता राहील अशा पद्धतीने त्यांनी उमेदवारी दिली आहे. पक्ष सोडा, विचार सोडा या देशातील घराणेशाही संपवा तरच देशातील लोकशाही वाचेल असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी भुसावळ येथे सभेत केले.

वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर येथे प्रचारार्थ सभेसाठी आले होते. त्यांनी आपल्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाजपा, एमआयएम या सर्व पक्षांचा समाचार घेतला व त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी एमआयएम व भाजपाचे एकच धोरण असल्याची टीका केली.  राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सेना यांना उमेदवारी देत नाही त्यांना एमआयएम उमेदवारी देऊन सहकार्य करीत असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
विरोधकांनी प्रचार करु नये म्हणून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुका या उन्हात घेतल्या जातात. जे एक देश- एक इलेक्शन अशी वल्गना करतात ते गरीब उमेदवाराला प्रचार करायचा असेल तर ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घ्यायला पाहिजे म्हणजे खर्चही अवकात राहील मात्र तसे होत नाही. त्यामुळे गरीब उमेदवारांना निवडणुकीचा खर्च झेपत नाही. त्यामुळे ते प्रचारी करत नाही.

राष्ट्रवादीला पण रावेर मतदारसंघ मागत होते. खडसे भाजपात गेल्यानंतरही आपण त्यांना मागितले होते. मात्र त्यांनी सांगितलं होतं की फॉर्म भरल्यावर उमेदवार दिसेल मात्र फॉर्म भरल्यावर फक्त पंधरा दिवसात तीन पक्ष बदलणाऱ्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली. अजित पवार नंतर भाजपा नंतर शरद पवार गट अशा पंधरा दिवसात प्रवास करणारा राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली. रावेर मध्ये सामाजिक संघटनांना बैठका बोलून पाच लाख रुपये वाटले असा आरोप करीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की बाकीचे संकट सुटणार सुटो पण तुमचे संकट जरूर सोडून द्यावे. छोटा भीम असेल तो देशाची बेमानी करेल जो स्वतःशी अप्रमाणिक असेल त्याला मतदान करू नका, दुसऱ्याला मतदान करण्याचे आव्हान त्यांनी केले. वैचारिक भ्रष्टाचार चालत नाही. आर्थिक भ्रष्टाचार चालतो असेही ते म्हणाले.

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी वर्षभर उपोषण केले. त्यांची फक्त एकच मागणी होती की हमीभावाचा कायदा करावा म्हणजे व्यापाऱ्यालाही हमीभावाने खरेदी करावे लागेल मात्र या देशाच्या पंतप्रधान त्यांना भेटायला गेला नाही. मागणी तर सोडा साधी माणुसकी त्यांनी दाखवली नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे नेते मूंग गिळून बसले आहेत. शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या नावावर जे नेते झाले ते शेतात पिकलेल्या पिकांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखानदार चे मालक आहेत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही म्हणून सावध राहावे. राष्ट्रवादीने निवडणूक होऊ नये म्हणून पाठिंबा दिला नव्हता इन्क्वारी लागू नये म्हणून पाठिंबा दिला होता. याचा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी मागितला आहे. सर्वसामान्य माणसाची जबाबदारी आहे की देशाची लोकशाही टिकली पाहिजे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news