Jalgaon crime: पिंप्राळ्यात महादेव मंदिराजवळ सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट ग्राहक पाठवून उघड केला गोरखधंदा; रोकड आणि टोकन जप्त
Prostitution Case
Prostitution CasePudhari
Published on
Updated on

जळगाव : पिंप्राळा परिसरातील हुडको रोडवर असलेल्या महादेव मंदिराजवळ एका घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्यावर रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी धडक छापा टाकला. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिला आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या मुख्य महिला संशयितासह तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात ‘पिटा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prostitution Case
Jalgaon crime: बिअर बार मालक अन् सरपंचाचा गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार; विकास सोलंकेला पहाटेच बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको रोडवरील महादेव मंदिराजवळ राहणारी छाया पितांबर बैरागी ही स्वतःच्या राहत्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. सायंकाळी वाजेच्या सुमारास पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला असता, घरातून देहव्यापारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख दोन हजार रुपयांची रक्कम मिळून आली.

Prostitution Case
Jalgaon crime news: कारागृहाच्या भिंतीवर चढून फटाके फोडणे भोवले; वाढदिवसासाठी केला प्रकार, दोघांना अटक

छाया पितांबर बैरागी (वय ४०, रा. पिंप्राळा हुडको रोड, महादेव मंदिराजवळ, जळगाव) अनिल बैजू चांगरे (वय ३६, मूळ रा. लक्ष्मण तात्या नगर, पारोळा; सध्या रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) संतोष गोपीनाथ बच्छाव (वय ४९, मूळ रा. नांदगाव, जि. नाशिक; सध्या रा. राज शाळेसमोर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल मधु सुरेश तिवाने (वय ३६, रामानंद नगर पो.स्टे.) यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) १९५६ चे कलम ३, ४, ५ आणि ७ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २४१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prostitution Case
Jalgaon crime: अमळनेरमध्ये अख्खं कुटुंब संपलं; पती-पत्नीने दोन लहान मुलींसह रेल्वेखाली जीवन संपवले

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिल्स आणि रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news