Jalgaon crime: बिअर बार मालक अन् सरपंचाचा गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार; विकास सोलंकेला पहाटेच बेड्या

बेकायदेशीर दारू विक्रीचा व्हिडिओ काढल्याच्या रागातून केला गोळीबार; कट्टा, काडतुसासह आरोपी गजाआड, डांभुर्णी-कोल्हावी परिसरात खळबळ
Gun firing
Gun firingPudhari
Published on
Updated on

​जळगाव : कायद्याचा धाक उरलाय की नाही? असा सवाल निर्माण करणारी धक्कादायक घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे घडली आहे. बीअर बारमध्ये छुप्या पद्धतीने होणाऱ्या देशी दारू विक्रीचा व्हिडिओ काढल्याचा राग आल्याने, दारूच्या नशेत असलेल्या सरपंचाने थेट देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत माजवली. याप्रकरणी यावल पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपी सरपंचाला आज शुक्रवारी (दि.२१८) पहाटेच बेड्या ठोकल्या आहेत.

Gun firing
Jalgaon crime news: कारागृहाच्या भिंतीवर चढून फटाके फोडणे भोवले; वाढदिवसासाठी केला प्रकार, दोघांना अटक

डांभुर्णी शिवारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हावी गावचा सरपंच असलेला विकास सोलंके (वय ३७) हा डांभुर्णी येथील एका बीअर बारचा मालक आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास गावातीलच दोन मुलांनी या बीअर बारमध्ये सर्रासपणे देशी दारूची अवैध विक्री होत असल्याचा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. यावरून विकास सोलंके आणि त्या दोन मुलांमध्ये तुफान वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर, मुलांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी दारूच्या नशेत धुंद असलेल्या सोलंकेने स्वतः जवळील देशी बनावटीच्या पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली.

Gun firing
Jalgaon crime: अमळनेरमध्ये अख्खं कुटुंब संपलं; पती-पत्नीने दोन लहान मुलींसह रेल्वेखाली जीवन संपवले

​पहाटेच बेड्या, गावठी कट्टा जप्त

हवेत गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच यावल पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. गोळीबारानंतर पसार झालेल्या आरोपी विकास सोलंकेचा पोलिसांनी रात्रभर शोध घेतला आणि आज शुक्रवारी पहाटेच मुसक्या आवळल्या.

Gun firing
Jalgaon crime : भुसावळ रेल्वे स्थानकावर १२ लाखांचा गांजा जप्त; दोन महिलांना रेल्वे सुरक्षा बलाने ठोकल्या बेड्या

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ आणि ५/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून १ देशी बनावटीचा कट्टा, १ जिवंत काडतूस आणि १ वापरलेली रिकामी पुंगळी जप्त केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या पथकाने डांभुर्णी येथील घटनास्थळी धाव घेत आवश्यक पुरावे गोळा केले आहेत.

Gun firing
Jalgaon crime: भुसावळ रेल्वे यार्डातील गोडाऊनमध्ये २३ वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

​३ महिन्यांपूर्वी खरेदी केला होता कट्टा!

पोलीस तपासात आरोपी विकास सोलंके याने सदर देशी कट्टा सुमारे ३ महिन्यांपूर्वी एका संशयित व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या 'बॅकवर्ड लिंक'च्या आधारे बेकायदेशीर शस्त्र पुरवणाऱ्या मुख्य म्होरक्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सध्या गावात पूर्णपणे शांतता असून यावल पोलीस ठाण्याचे पथक पुढील सखोल तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news