Manikrao Kokate: दोष नसताना कोणाच्याही अंगावर शिंतोडे उडवणार का? अजितदादांसाठी कोकाटेंची बॅटिंग

माध्यमानांच केला सवाल, दादांना अनावश्यक प्रकरणात गोवण्याचा प्रकार
Manikrao Kokate
Manikrao Kokate(file photo)
Published on
Updated on

जळगाव : दादांना अनावश्यक या प्रकरणात गुंतवण्याची प्रक्रिया होत आहे. दादांची काम करण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे दादा असे काम करणार नाही. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे दोष नसताना कोणालाही किंवा कोणावरी शिंतोडे उडवणार का ? असा प्रश्न माध्यमांशी बोलताना माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला. ते आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या भुसावळ व जळगाव लोकसभेच्या विधानसभा क्षेत्रावरील मुलाखती घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

Manikrao Kokate
Manikrao Kokate | निवडणूक हरल्यामुळे बच्चू कडूंना ‘फ्रस्ट्रेशन’ : माणिकराव कोकाटे

यापुढे माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आढावा घेतलेला आहे. पदाधिकारी या ठिकाणी युतीचा निर्णय घेतील उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित दादा यांचे नाव अनावश्यक या प्रकरणात गुंतवण्याची प्रक्रिया होत आहे. ते असे कधीच काम करीत नाही आरोप कोणी केल्या आरोप सिद्ध झाले आहे का ते चौकशीला समोरी जातील असे आम्ही जाहीरपणे सांगतोय. त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत राजीनामा कशाला दोषी नसताना कोणावर शिंतोडे उडवणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Manikrao Kokate
Parth Pawar Land Deal: पार्थ पवारांवरील आरोपांवर महसूलमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले, चौकशी पूर्ण होऊ द्या मग...

त्यांच्याशी किंवा ज्यांना ज्यांना युती करायचे त्यांच्याशी युती करू ज्यांना युती करायची नाही किंवा नसेल त्यांच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आमची आहे. व स्वतंत्र लढू आम्ही युती कोणाची ही करू समोरील प्रस्ताव तो मान्य असल्याशिवाय युती होणार नाही असे माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news