Yawal Theft Case: यावलमध्ये चोरट्यांची जिलेबी विक्रेत्याच्या घरातून पावणे ६ लाख लंपास

विरार नगरमध्ये खळबळ; भरदिवसा कुलूप तोडून साडेपाच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास
Theft Case
Theft CasePudhari
Published on
Updated on

जळगाव: यावल शहरातील विरार नगर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या गस्तीला आव्हान देत एका बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एका जिलेबी सेंटर चालकाच्या घरी झालेली ही मोठी घरफोडी शहरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली असून, चोरट्यांनी रोख ५ लाख ५० हजार रुपयांसह सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे.

Theft Case
Jalgaon Diesel Theft : Jalgaon Diesel Theft: वाळवंटातील 'ऑपरेशन डिझेल चोर', 'अपघाती' बनाव धुळीस मिळाला; जळगाव पोलिसांची कारवाई

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विरार नगर येथील रहिवासी शेख साबिर शेख प्यारेसाहब (वय ३४) हे आपला जिलेबी सेंटरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. १७ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०० वाजेच्या दरम्यान जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.

Theft Case
Jalgaon Gold Theft | धावत्या बसमध्ये 'कटर गँग' सक्रिय; लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

कपाटाचे लॉक तोडून धुमाकूळ

घरात प्रवेश केल्यानंतर शेख साबिर यांना धक्काच बसला. अज्ञात चोरट्यांनी केवळ दरवाजाचेच नाही, तर घरातील लोखंडी कपाटाचे देखील लॉक तोडले होते. चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम (ज्यात ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता) आणि ३८ हजार रुपये किमतीचे ६.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स् (एरिंग) असा एकूण ५ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

Theft Case
Jalgaon theft news | पारोळ्यात धाडसी डल्ला; साडेपाच लाखांची पिशवी लंपास

खाकीकडून तपासाची चक्रे गतिमान

याप्रकरणी शेख साबिर यांनी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी यावल पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ००४५/२०२६ दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

Theft Case
Jalgaon Robbery | जळगाव, मुक्ताईनगरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीत १० लाखांचा मुद्देमाल लंपास

तपासाचे आव्हान:

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) अनिल महाजन हे करीत आहेत. शहरात भरदिवसा आणि भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी मोठ्या रकमेची रोकड पळवल्याने हा गुन्हा नियोजनबद्ध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news