Jalgaon News: शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न भस्म! विद्युत तारांच्या ठिणगीमुळे धरणगाव-जामनेरमध्ये मका, कडब्यासह ठिबक जळून खाक

जळगाव जिल्ह्यात धरणगाव आणि जामनेर तालुक्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे मिळून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
Jalgaon News
Jalgaon Newsfile photo
Published on
Updated on

Jalgaon News

जळगाव: कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांचा पाठ सोडायला तयार नाहीत. जळगाव जिल्ह्यात धरणगाव आणि जामनेर तालुक्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे मिळून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे उडालेल्या ठिणग्यांनी उभी पिके आणि सिंचनाचे साहित्य गिळंकृत केल्याने या परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Jalgaon News
Jalgaon news | शेतकऱ्यांच्या घामाचे 'मोती' आगीत खाक; महावितरणच्या ठिणगीने 'सोनं' झालं कोळसा

धरणगावात डीपीची ठिणगी अन् मका झाला खाक!

धरणगाव येथील डॉ. हेडगेवार नगर शिवारातील शेत गट क्रमांक ११७ मध्ये महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. वाऱ्यामुळे डीपीवरून उडालेली ठिणगी थेट शेतात पडल्याने तुषार वसंत चौधरी या तरुण शेतकऱ्याच्या ५ बिघे मका पिकापैकी ३ बिघे पीक पूर्णपणे जळून खाक झाले.

या आगीत केवळ उभे पीकच नव्हे, तर पिकाला पाणी देण्यासाठी अंथरलेल्या ठिबकच्या नळ्या आणि ६ पीव्हीसी पाईपही जळाले. यात शेतकऱ्याचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी 'अकस्मात आग' म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील अधिक तपास करत आहेत.

जामनेरात तारांच्या घर्षणाने ठिबक आणि चारा जळाला!

दुसरी घटना जामनेर तालुक्यातील करमाड शिवारात घडली. २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समाधान सुरेश पाटील (रा. पळसखेडा मिराचे) यांच्या शेतातून गेलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. या तारांमधून उडालेली आग खाली पडल्याने क्षणात रौद्र रूप धारण केले.

या आगीत पाटील यांच्या ३ एकर क्षेत्रातील जैन कंपनीच्या ठिबक नळ्या (किंमत १ लाख ४० हजार) आणि ५० हजार रुपयांचा ज्वारीचा कडबा तसेच भुसा जळून खाक झाला. एकूण १ लाख ९० हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश भावसार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Jalgaon News
शॉर्टसर्किटमुळे ५ एकर मका जळून खाक ; शेतकरी कुटुंबावर आर्थिक आघात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news