शॉर्टसर्किटमुळे ५ एकर मका जळून खाक ; शेतकरी कुटुंबावर आर्थिक आघात

Nanded short circuit fire | चार महिन्यांच्या परिश्रमानंतर उभे राहिलेले पीक कापणीच्या उंबरठ्यावर असतानाच आगीच्या विळख्यात सापडले
शॉर्टसर्किटमुळे ५ एकर मका जळून खाक ; शेतकरी कुटुंबावर आर्थिक आघात
Published on
Updated on

किनवट : तालुक्यातील मलकजाम येथे शुक्रवारी (दि.17) दुपारच्या सुमारास विद्युत तारांमधील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५ एकर क्षेत्रावरील मका पीक जळून खाक झाल्याची घटना घडली. कापणीस तयार असलेले पीक आगीत भस्मसात झाल्याने संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

मलकजाम येथील सुमनबाई पोतन्ना अंगरवार व पोतन्ना नारायण अंगरवार यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक ३६२ मधील सुमारे २ हेक्टर क्षेत्रातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चार महिन्यांच्या परिश्रमानंतर उभे राहिलेले पीक कापणीच्या उंबरठ्यावर असतानाच आगीच्या विळख्यात सापडले.

स्थानिकांच्या माहितीनुसार, परिसरातील महावितरणच्या विद्युत तारा अनेक ठिकाणी सैल व झुकलेल्या अवस्थेत असून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळी तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पिकावर पडल्याने काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबरोबरच संभाव्य निष्काळजीपणाबाबत जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news