Jalgaon Zilla Parishad | जळगाव जिल्हा परिषदेतील २०७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

Jalgaon News | मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचा केवळ पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत निर्णय
Zilla Parishad Jalgaon
Zilla Parishad JalgaonPudhari News Network
Published on
Updated on

Jalgaon ZP staff promotion

जळगाव : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण 207 कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मार्च 2025 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत हा निर्णय घेतला.

ही पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य ठेवल्याचे विशेष आहे. पदोन्नतीसंदर्भातील सर्व बैठकांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आले असून, ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या इतिहासातील एक आदर्श व अभिनव पाऊल ठरली आहे.

Zilla Parishad Jalgaon
Ganesh Chaturthi : जळगाव जिल्ह्यात 177 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती' परंपरा कायम

विभागनिहाय पदोन्नतीचे तपशील :

• बांधकाम विभाग – 11कर्मचारी

• ग्रामपंचायत विभाग – 11 कर्मचारी

• कृषी विभाग – 5 कर्मचारी

• आरोग्य विभाग – 63 कर्मचारी

• पशुसंवर्धन विभाग – 07 कर्मचार

• अर्थ विभाग -14

• सामान्य प्रशासन विभाग – विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी -03

• शिक्षण विभाग – 93

Zilla Parishad Jalgaon
Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेतील लाचखोर लिपीकाला रंगेहाथ अटक

विभागनिहाय पदोन्नती अशी

अर्थ विभाग – सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी इत्यादी पदे, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यका, पशूसंवर्धन विभागातील वर्णपचारक, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी, कृषी विभागातील विस्तार अधिकारी, शिक्षण विभागाकडील ग्रेडेड मुख्याध्यापक ,विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी,वरिष्ठ सहाय्यक,या संवर्गातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.

एकूण 207 कर्मचारी विविध संवर्गामध्ये या कालावधीत पदोन्नत झाले आहेत . या पदोन्नती प्रक्रियेने जिल्हा परिषद जळगाव प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, कर्मचारी वर्गाचे मनोबल उंचावणे व कार्यक्षेत्रात स्थिरता निर्माण करणे या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news