जळगाव : तिसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झालेल्या महिला कामगाराचा मृत्यू

एमआयडीसी परिसरातील घटना
Workplace accident
तिसऱ्या मजल्यावरून पडून महिला कामगाराचा मृत्यू झाला.File Photo
Published on
Updated on

जळगाव : येथील एमआयडीसीतील ई सेक्टरमध्ये इमारतीच्या बांधकाचे काम सुरू होते. यादरम्यान तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून एक महिला कामगार गंभीर जखमी झाली होती. ही घटना २ ऑक्टोबर रोजी घडली होती. या महिलेचा आज (दि.८) उपचारादरम्यान पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी जबाबदार असलेल्या बांधकाम मालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिलाबाई शंकर चव्हाण (वय ५५ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे या महिलेचे नाव आहे.

Workplace accident
Jalgaon Accident | कारचे टायर फुटल्याने शिवशाहीला धडकली, तिघांचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी, प्रमिलाबाई या एमआयडीसीतील ई सेक्टरमधील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करीत होत्या. २ ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावर त्या साफसफाई करून वेस्ट मटेरियल खिडकीतून फेकत असतांना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना त्यांचा आज (मंगळवारी) पहाटे ४ वाजता मृत्यू झाला.

Workplace accident
नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णाचा प्रवाशांवर हल्ला, दोघांचा मृत्यू , ३ जखमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news