नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णाचा प्रवाशांवर हल्ला, दोघांचा मृत्यू , ३ जखमी

माथेफिरूच्या हल्‍ल्‍याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Psychiatric person attacks passengers at Nagpur railway station, 2 dead, 3 injured
नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णाचा प्रवाशांवर हल्ला, दोघांचा मृत्यू , ३ जखमीFile Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

उपराजधानी नागपुरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. एका माथेफिरूने फलाटावर अचानक प्रवाशांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. यातील एक प्रवासी तामिळनाडू येथील असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

हा प्रकार अचानक घडल्याने कुणाला सावरण्याचा वेळच मिळाला नाही. तो मनोरुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य रेल्वे स्थानकावरच्या फलाट क्रमांक 7 वर पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली. संशयित आरोपीस गजाआड करण्यात आले असले तरी त्याने हे कृत्य का केले, यामागचे गूढ कायम आहे. यामुळे रात्रीच्या वेळी गाड्यांच्या प्रतीक्षेत बसणाऱ्या, फलाटावर झोपलेल्या प्रवाशांचा व पर्यायाने रेल्वे स्थानकावरील सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आला आहे.

नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक सातवर प्रवाशी रेल्वेची वाट पाहत होते. याचवेळी अचानक एका मनोरुग्णाने लाकडी राफ्टरने प्रवाशांवर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. हल्ल्यात दोन प्रवासी ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा संशयित आरोपी फलाटावर आकस्मिक लोकांना मारत सुटल्याने प्रवासी देखील पळत सुटले. गणेश कुमार डी (वय ५४) ( दिंडीगुल तामिळनाडू) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. दुसऱ्या मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. संशयिताने निर्घृणपणे हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, कर्मचाऱ्यांनी लगेच रेल्वे रुळावर पाठलाग करून या व्यक्‍तीला पकडले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार प्रथमच घडल्याने पोलीसही चक्रावले आहेत. कॉटन मार्केट बाजूने रेल्वे स्थानकावर भिकारी, असामाजिक तत्वांचा वाढता वावर रोखण्याचे आव्हान आता जीआरपी, शहर पोलिसांपुढे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news