जळगाव : मनपाच्या गाळेधारकांचा प्रश्‍न अखेर मार्गी

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा , शहरामध्ये महानगरपालिकेने बांधलेल्या गाड्यांच्या भाड्याच्या प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. गाळे नूतनीकरण करण्याचा नुकताच मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे शहरातील २३६८ गाळे धारकांना नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झालेला असून यासाठी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी प्रयत्न करून तो मार्ग मार्गे लावला.

संबधित बातम्या :

शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. व्यापार्‍यांना आता दिलासा मिळाला आहे. आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुराव्या मुळे १० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या संदर्भात राज्य पातळीवरील निर्णय घेण्यात आला.

मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार, सुधारित महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मालमत्ता भाडेपट्ट्याद्वारे हस्तांतरण व भाडेपट्ट्याचे नुतनीकरण) नियम, २०२३ मध्ये निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक, व्यावसायिक तसेच औद्योगिक या सर्व प्रयोजनांकरिता १३ सप्टेंबर, २०१९ रोजी निर्गमित अधिसूचनेद्वारे निश्चित भाडेपट्टा दरापूर्वी जो दर संबंधीत महानगरपालिकांमध्ये प्रचलित होता, त्या भाडेपट्टा दरामध्ये दुप्पट प्रमाणापर्यंत आवश्यकतेनुसार भाडेपट्टा दरामध्ये वाढ करण्यात यावी. सदर दर निश्चिती आयुक्त, महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली गठीत भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समिती द्वारे निश्चित करण्यात यावी, अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे जळगावातील गाळेधारकांच्या नूतनीकरणाचा प्रश्‍न खर्‍या अर्थाने मार्गी लागला आहे.

व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटल्याने महापालिकेचे नुकसान होणार नसून गाळेधारकांनाही दिलासा मिळेल, शासन निर्णयाचे स्वागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री ना. अनिल पाटील यांच्या सहकार्यामुळे यश मिळाले असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले.

या संदर्भात आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, जळगाव शहरातील गाळे धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून यामुळे जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील गाळे धारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्थावर मालमत्तेचे भाडे पट्यावरद्वारे हस्तांतरण आणि भाडेपट्याचे नुतनीकरन करण्याचा प्रश्न मोकळा झालेला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news