Jalgaon burglary case solved|जळगाव शहर पोलिसांनी घरफोडीचा छडा लावला ६ तासांत, सराईत संशयिताला ठोकल्या बेड्या

Jalgaon Theft | गेंदालाल मिल परिसरातील अटक; २८ हजारांची रोकड हस्तगत
Jalgaon burglary case solved
Jalgaon burglary case solved
Published on: 
Updated on: 

जळगाव : जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या सहा तासांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी असमतखा इलियास खा कुरेशी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

शेख अनिस शेख चाँद (वय ३५, व्यवसाय मोबाईल रिपेअरिंग, रा. निसार कॉलनी, जळगाव) यांच्या घरात ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाली होती. चोरट्याने घरातून चांदीच्या पैंजणासह सोन्याचे दोन पोत आणि चार हजार रुपयांची रोकड असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. या फ्रकरणी फिर्याद जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गुन्हा क्रमांक २७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मिल परिसरात संशयिताचा शोध घेतला. यावेळी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, असमतखा इलियास खा कुरेशी याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्याचा शोध घेतला असता तो रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सखोल चौकशीनंतर त्याने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून २८ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी ही कारवाई केली.

Jalgaon burglary case solved
Dhule Jail Clashes | धुळे कारागृहात ताट धुण्यावरून कैद्यांमध्ये हाणामारी

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील जीपीएसआय सुनील पाटील, सहाय्यक फौजदार दीपक शिरसाट, हवालदार नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Jalgaon burglary case solved
Dhule Jamphal PDN scheme Shindkheda| पिढ्यान्पिढ्यांचा दुष्काळ संपला! तापी नदीचे पाणी पोहोचणार शिंदखेड्याच्या शिवारात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news