Jalgaon Police| 12 लाख 50 हजार किंमतीचे मोबाईल नागरिकांना दिले परत मिळवून

चोरीला किंवा गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सचा पोलिसांनी घेतला शोध
Jalgaon Police
पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत देण्यात आलेPudhari Photo
Published on
Updated on

जळगावः जिल्ह्यामधील तालुक्यातील गहाळ झालेले किंवा चोरीला गेलेले 62 मोबाईल ज्यांची किंमत बारा लाख 50 हजार रुपये आहेत यांचा शोध घेऊन ते मोबाईल धारकांना आज पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते परत देण्यात आले.

Jalgaon Police
Jalgaon News : दिवाळीपूर्वीच अन्न नमुन्यांची तपासणी; लॅबकडून अहवाल आल्यानंतरच कारवाई

जिल्हातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासकरिता पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली. पोलीस निरीक्षक सतिष गोराडे, व पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे, यांना आदेशित केले होते त्यानुसार सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथील किरण वानखेडे, हेमंत महाडिक, सचिन सोनवणे, पंकज वराडे गौरव पाटील, मिलींद जाधव, दिपक पाटील जळगाव पो.स्टे असे पथक तयार करुन मिसींग मोबाईल शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहीमेत जळगाव जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध महाराष्ट्र व इतर राज्य अशा वेगवेगळया ठिकाणी जावून एकूण 12 लाख 50 हजार रुपयाचे 62 मोबाईल हस्तगत करण्यात आले, त्या सर्व मोबाईलचे आज 18 रोजी मोबाईल मालकांना पोलीस अधिक्षक जळगाव वाटप करण्यात आले आहे.

Jalgaon Police
Jalgaon Police | जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठा फेरबदल

सदरची गहाळ मोबाईल यांचे IMEI क्रमांकासह संपूर्ण माहीती जळगाव पोलीस फेसबुक पेज यावर अपलोड केलीआहे. म. पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी नागरिकांना CEIR पोर्टलवर गहाळ मोबाईलची माहीती अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news