Jalgaon Police | जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठा फेरबदल

एमआयडीसीचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे पुन्हा एलसीबीचा कार्यभार
police transferred news
police transferred newsFile Photo
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासनिक बदल करण्यात आले असून, तब्बल ४०० हून अधिक पोलिसांच्या बदल्या या फेरबदलांत करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे दुसऱ्यांदा स्थानिक गुन्हे शाखेचा (एलसीबी) कार्यभार सोपवण्यात आला आहे.

या बदल्यांमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवे नेतृत्व व नवी कार्यपद्धती राबवली जाण्याची अपेक्षा आहे. एमआयडीसीचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांची एलसीबीमध्ये बदली तर एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

या बदलांमागे काही अंशी राजकीय भूमिका असल्याचे बोलले जात असले तरी, यामुळे स्थानिक पातळीवर पोलिसांमध्ये समन्वय, पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवणे आवश्यक ठरेल. नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना त्वरित स्थानिक समस्या सोडवणे आणि जनतेचा विश्वास जिंकणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

प्रमुख बदल्या अशा...

  • स्थानिक गुन्हे शाखा : बबन आव्हाड - एमआयडीसी

  • एमआयडीसी : संदीप पाटील - स्थानिक गुन्हे शाखा

  • चोपडा ग्रामीण : कावेरी कमलाकर -शनिपेठ

  • अमळनेर : दत्तात्रय निकम - अमळनेर

  • शनिपेठ : रंगनाथ - यावल

  • यावल : प्रदीप ठाकूर - जिल्हा पेठ

  • पारोळा : सुनील पवार - नियंत्रण कक्ष

  • पहूर : सचिन सानप - पारोळा

  • आर्थिक गुन्हे शाखा: सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे - प्रभारी पहूर

  • वरणगाव : सपोनि जनार्दन खंडेराव - यावल

  • भुसावळ बाजारपेठ : सपोनि अमित कुमार बागुल - प्रभारी वरणगाव

  • पिंपळगाव हरेश्वर : सपोनि प्रकाश काळे - जळगाव शहर

  • जळगाव शहर : सपोनि कल्याणी वर्मा - प्रभारी पिंपळगाव हरेश्वर

  • पाचोरा : पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे - स्थानिक गुन्हे शाखा

या बदल्यांमुळे काही अंमलदारांमध्ये अस्वस्थता असून, स्थानिक गुन्हे शाखेत नव्या नियुक्त्या झाल्या नसल्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, एकूणच या फेरबदलांमुळे जिल्ह्यातील पोलिसिंग कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news