Jalgaon Police | जळगावचे पोलीस शिपाई किरण धमकेंचा २५६ सन्मानांसह पोलीस महासंचालक पदकाने गौरव

नक्षलवादविरोधी मोहिमा असोत किंवा शहरातील गुन्हेगारीवर लगाम लावण्याची कारवाईमुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीची ठळक छाप उमटवली
Kiran Dhamke Jalgaon Police
Kiran Dhamke Jalgaon PolicePudhari
Published on
Updated on

Kiran Dhamke Jalgaon Police

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ पोलीस शिपाई किरण निंबालाल धमके यांनी आपल्या २७ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेत ‘खाकी’ची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे. नक्षलवादविरोधी मोहिमा असोत किंवा शहरातील गुन्हेगारीवर लगाम लावण्याची कारवाईमुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीची ठळक छाप उमटवली आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत २५६ बक्षिसे मिळाली असून मानाचे ‘पोलीस महासंचालक पदक’ही बहाल करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे जळगाव पोलीस दलात कौतुक होत आहे.

Kiran Dhamke Jalgaon Police
Jalgaon Robbery | जळगावात लग्नसराईत चोरटे सक्रिय; दोन वेगवेगळ्या घटनांत लाखांचा ऐवज लंपास

गेल्या पाच वर्षांपासून उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या धमके यांनी अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. ‘पिटा’ (PITA) कायद्यांतर्गत त्यांनी अनेक धडक मोहिमा राबवल्या.

डिसेंबर २०२४ मध्ये अवैध वाळू वाहतुकीविरोधात केलेली कारवाई तसेच गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादसारख्या सणांदरम्यान राखलेला उत्कृष्ट बंदोबस्त हे त्यांच्या कामगिरीचे ठळक उदाहरण ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे.

Kiran Dhamke Jalgaon Police
Jalgaon Crime | नराधम पतीसह जन्मदातेही निघाले वैरी! अल्पवयीन मुलीचा केला बालविवाह; मुल जन्माला आल्यानंतर प्रकार उघडकीस

सुमारे तीन दशकांच्या सेवेत किरण धमके यांनी आपल्या कामातून वेगळा ठसा उमटवला असून, त्यांच्या योगदानामुळे जळगाव पोलीस दलाच्या मानात लक्षणीय भर पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news