Jalgaon Crime | नराधम पतीसह जन्मदातेही निघाले वैरी! अल्पवयीन मुलीचा केला बालविवाह; मुल जन्माला आल्यानंतर प्रकार उघडकीस

सांगवी बुद्रुक हादरले! अनैतिक संबंधातून पीडितेने दिला मुलाला जन्म; आई-वडिलांच्या संमतीनेच पार पडला होता 'बालविवाह'
Minor girl abuse
Minor girl abusePudhari
Published on
Updated on

जळगाव : आई-वडील हे मुलांचे रक्षणकर्ते असतात, मात्र यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत तिला नरकयातनेच्या खाईत लोटणाऱ्या आई-वडिलांसह, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम पतीवर यावल पोलीस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहून तिने एका मुलाला जन्म दिल्यानंतर हा संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय उर्फ बंटी राजेंद्र सोनवणे (वय २६, रा. सांगवी बुद्रुक) याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्याशी विवाह केला. हा विवाह सांगवी बुद्रुक येथील जैतवन बुद्ध विहाराजवळ पार पडला. "तू आता माझी बायको आहेस," असे म्हणून अक्षयने पीडितेशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या नराधमाच्या कृत्यामुळे अवघ्या काही वर्षांची ही बालिका गरोदर राहिली. २८ एप्रिल २०२६ रोजी तिची प्रसूती होऊन तिने एका बालकाला जन्म दिला आहे.

Minor girl abuse
Beed Crime : केज हादरले! सावत्र बापाचा १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेचे वडील चंद्रकांत शामराव बनसोडे आणि आई आशाबाई चंद्रकांत बनसोडे (रा. वड्री, ता. यावल) यांनीच आपल्या मुलीचे भवितव्य अंधारात ढकलले. मुलगी कायद्याने लग्नासाठी पात्र नसतानाही केवळ जबाबदारी झटकण्यासाठी त्यांनी अक्षयसोबत तिचे लग्न लावून दिले. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करत आपल्याच लेकीला संकटात ढकलणाऱ्या या पालकांमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

सदर गुन्हा सुरुवातीला करमाळा पोलीस स्टेशन (जि. सोलापूर) येथे शून्य क्रमांकाने दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तो आता यावल पोलीस ठाण्यात ऑनलाईन वर्ग करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), (एम), ६५(१) तसेच पोक्सो कायद्याचे कलम ४, ६, ८, १२ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम ९, १०, ११ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news