Jalgaon Police | सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई; ५२ लाखांहून अधिक दंड वसूल

जिल्हा पोलिसांसह महामार्ग सुरक्षा पथकाने एकूण ७ हजार १०५ प्रकरणे नोंदवत ५२ लाख ४५ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल
Jalgaon Police Traffic Fine Collection
Jalgaon Police Traffic Fine Collection Pudhari
Published on
Updated on

Jalgaon Police Traffic Fine Collection

जळगाव : आगामी ईद, दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत जिल्हा पोलिसांसह महामार्ग सुरक्षा पथकाने एकूण ७ हजार १०५ प्रकरणे नोंदवत ५२ लाख ४५ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल केला.

सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. विनाहेल्मेट वाहन चालविणे, तिहेरी सीट, मद्यपान करून वाहन चालविणे यांसह विविध वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांवर पोलिसांनी कारवाई केली.

Jalgaon Police Traffic Fine Collection
Jalgaon Police Raid | नशिराबाद येथे देहव्यापार केंद्रावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, दोन महिलांची सुटका

विनाहेल्मेट आणि ट्रिपल सीटवर कारवाई

विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या ८५३ जणांवर, तर तिहेरी सीटवर प्रवास करणाऱ्या ५५९ जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४२ चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शाळा-कॉलेज परिसरावरही लक्ष

शाळा आणि महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसह विनापरवाना शालेय वाहतूक करणाऱ्यांविरुद्धही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत ३०० हून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली.

Jalgaon Police Traffic Fine Collection
Jalgaon Police Raid | जळगावात मोठी कारवाई : एकाच दिवशी चार जुगार अड्ड्यांवर छापेमारी; ८ बुकी जेरबंद

अल्पवयीन चालकांवरही कारवाई

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणाऱ्या पालकांनाही पोलिसांनी दणका दिला. वाहन चालविताना आढळलेल्या ५८ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली.

मॉडिफाइड सायलेन्सरवर कारवाई

कर्णकर्कश आवाज करणारे आणि फटाक्यांसारखा आवाज निर्माण करणारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली. अशा १५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

Jalgaon Police Traffic Fine Collection
Jalgaon Police |भरलेल्या बंदुका बेवारस सोडून पोलिस कर्मचारी गायब; दोन पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड

महामार्ग सुरक्षा पथकाने स्वतंत्रपणे १ हजार ४३५ प्रकरणांमध्ये कारवाई करत १२ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल केला. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि अशोक नखाते यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या विशेष मोहिमेचे थेट निरीक्षण केले.

सण उत्साहात आणि आनंदात साजरे करताना नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे वाहन चालवू नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही 

- श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news