Jalgaon Police Raid | नशिराबाद येथे देहव्यापार केंद्रावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, दोन महिलांची सुटका

नशिराबाद-सुनसगाव मार्गाजवळील शेतात अनैतिक व्यवसाय सुरू
Nasirabad Flesh Trade Busted
Nasirabad Flesh Trade BustedPudhari
Published on
Updated on

Nasirabad Flesh Trade Busted

नशिराबाद (जि. जळगाव) : नशिराबाद-सुनसगाव मार्गालगत असलेल्या एका शेतात सुरू असलेल्या देहव्यापारावर नशिराबाद पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून सुमारे ९१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी नशिराबाद ते सुनसगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी एका खाजगी पंटरला बनावट ग्राहक म्हणून संबंधित ठिकाणी पाठवले.

Nasirabad Flesh Trade Busted
Jalgaon crime: अपघाताचा बनाव रचणारा नराधम पुतण्या रावेर पोलिसांच्या जाळ्यात

माहितीची खात्री झाल्यानंतर दुपारी सुमारे २.२० वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत प्रदीप जनार्दन रोटे (वय ५७, रा. नशिराबाद) आणि कैलास संजय भोई (रा. नशिराबाद) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

छाप्यामध्ये दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून घटनास्थळावरून देहव्यापाराशी संबंधित सुमारे ९१,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत.

Nasirabad Flesh Trade Busted
Jalgaon News | कुऱ्हा-जामनेर मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे अपघातांचा धोका वाढला

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोहेकॉ गुणवंत देशमुख, पोहेकॉ प्रशांत विरणारे, पोकॉ भरत बाविस्कर, पोकॉ पंकज सोनवणे, पोकॉ सागर बिडे, पोकॉ प्रवीण लोहार आणि पोकॉ भूषण पाटील यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news