Jalgaon Cattle Smuggling : गोवंश तस्करांचे धाबे दणाणले; ७८ जनावरांची सुटका, १४ वाहने ताब्यात अन् २४ गुन्हे दाखल

जळगाव पोलिसांची धडक कारवाई
Cattle Smuggling
Cattle SmugglingPudhari
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलखान्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ३० एप्रिल ते २ मे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. या तीन दिवसांच्या धडक कारवाईत तब्बल ६१ लाख ३३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात करत २४ गुन्हे दाखल करण्यात आले.

Cattle Smuggling
Heroin seizure: सुळगेत अडीच लाखांचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमासह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२५ अन्वये कडक कारवाई करण्यात आली. धरणगाव, यावल, शनिपेठ, रावेर, चाळीसगाव, मेहुणबारे, एमआयडीसी, एरंडोल आणि चोपडा या भागात पोलिसांनी छापे टाकून २५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले.

या कारवाईत १४ वाहने (किंमत ४६,लाख १० हजार रुपये) व ४६३ किलो (अवैध गोमांस) जप्त करण्यात आले व ७८ (गायी, बैल, गोऱ्हे व म्हशी) गोवंशाची सुटका करण्यात आली. असा एकूण ६१ लाख ३३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) आणि संदीप गावीत (जळगाव विभाग) यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वी केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गोवंश तस्करांच्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

Cattle Smuggling
Thane Crime : ठाण्यातील भोंदूबाबाची गोव्यामध्ये अय्याशी !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news