Jalgaon Chess Players | जळगाव जिल्ह्यातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धा; निवड झालेल्या खेळाडूंचा गौरव
State Level Chess Competition
State Level Chess CompetitionPudhari
Published on
Updated on

State Level Chess Competition

जळगाव : जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील आठ व ७ वर्ष वयोगटातील दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा १५ ते १७ मे २०२६ दरम्यान पुणे येथे होणार आहे.

तर सात वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा ३० ते ३१ मे २०२६ ला पुणे येथे होतील. या स्पर्धांसाठी १९ वर्षाआतील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये जळगावचा तसीन तडवी तर मुलींमध्ये पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे प्रथम, तर ७ वर्ष आतील गटात पाचोर्‍याचा विहान वाघ प्रथम देव वेद द्वितीय यांची निवड झाली आहे. विजेत्यांचे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले.

State Level Chess Competition
Jalgaon PWD Office | लाच प्रकरणानंतर PWD उपविभाग कार्यालय अद्याप सील; कामकाजावर परिणाम

मुलांच्या गटातून तसीन रफिक तडवी, कुशान ज्ञानदेव चौधरी, पियुष माळी, जामनेरचा उदय पाटील तर मुलींच्या गटातून पाचोराची ऋतुजा बालपांडे, स्वरा वाघ, जळगावची हर्षदा पाटील, पालवी गणेश माळी, यांनी राज्यस्तरीय फेरीत प्रवेश मिळवला. तर सात वर्षे वयोगटात पाचोर्‍याचा विहान वाघ, देव वेद यांची निवड झाली.

अश्वतसिंग राजपूत भुसावल, ज्ञानदा मनोरे चोपडा यांना उत्तेजनार्थ पारतोषिक देण्यात आले. कांताई सभागृहात येथे झालेल्या निवड चाचणीत सहा फेऱ्यांमधून जिल्ह्यातील एकूण ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रत्येकी चार मुलं व चार मुलींची निवड करण्यात आली. तर सात वर्षे वयोगटात दोन मुले यांची निवड करण्यात आली.

State Level Chess Competition
Jalgaon child marriage case: अल्पवयीन मुलीचे मंदिरात गुपचूप लग्न; आजीची पोलिसांत धाव, आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

यावेळी विविध वयोगटांतील विजेत्यांना चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. तर तर उत्तेजनार्थ रुद्रांश चेतन तायडे, दुर्वेश कोळी, द्रोणा जामले, शर्मा, भावेश सोनार, कार्तिक कासार, गौरव बारी, चिन्मय मगर, अभंग सोनवणे यांना मेडल देऊन गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सय्यद मोहसिन, किशोरसिंह शिसोदिया, जैन इरिगेशन मिडीया विभागाचे देवेंद्र पाटील, बुद्धिबळ प्रशिक्षक परेश देशपांडे, प्रमुख पंच प्रवीण ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news