Jalgaon PWD Office | लाच प्रकरणानंतर PWD उपविभाग कार्यालय अद्याप सील; कामकाजावर परिणाम

काही दिवसांपूर्वी शाखा अभियंता योगेश अहिरे यांना कथित लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले uals
PWD Bribery Case  Jalgaon
PWD Bribery Case JalgaonPudhari
Published on
Updated on

PWD Bribery Case Jalgaon

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) संबंधित कार्यालय सील केले आहे. सोमवारीही कार्यालय बंदच राहिल्याने कामकाज ठप्प झाले आहे. या कारवाईमुळे विभागातील कार्यपद्धती आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी शाखा अभियंता योगेश अहिरे यांना कथित लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले होते. त्यानंतर तपासाचा भाग म्हणून उपविभाग कार्यालय सील करण्यात आले. शनिवारपासून बंद असलेले कार्यालय सोमवारपर्यंत सुरू न झाल्याने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची गैरसोय झाली.

PWD Bribery Case  Jalgaon
Jalgaon News | सुनेचा काटा काढून पुण्यातून सासरा पळाला; जळगाव एलसीबीने मेहरुणमध्ये मुसक्या आवळल्या!

कार्यालय बंद असल्याने अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात न दिसता शहरातील विविध कामांच्या ठिकाणी उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांमध्ये चौकशीची भीती असल्याची चर्चा विभागीय वर्तुळात सुरू आहे.

सामान्य नागरिकांना विविध कामांसाठी कार्यालयात येऊनही अधिकारी उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. “कार्यालय सील असल्याने कामकाज मर्यादित आहे,” असे कारण देत काही कर्मचारी नागरिकांना परत पाठवत असल्याची तक्रारही समोर येत आहे.

PWD Bribery Case  Jalgaon
Jalgaon Theft News | जळगाव जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ! शिरसोलीत घरफोडी, भुसावळ बसमध्ये 6.70 लाखांचा डल्ला

या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी योगेश ठाकूर यांनी सांगितले की, “संबंधित प्रकरणातील काही महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कार्यालय सील ठेवण्यात आले आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news