Jalgaon | सॉप्टवेअर इंजिनिअरने संपविले जीवन, कारण अस्पष्ट

Jalgaon | सॉप्टवेअर इंजिनिअरने संपविले जीवन, कारण अस्पष्ट
Published on
Updated on

जळगाव पुढारी वृत्तसेवा : यावल शहरातील महाजन गल्लीत राहणाऱ्या एका उच्च‍ शिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअरने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेवून आपले जीवन संपविले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अक्षय प्रमोद करांडे वय-२७, रा. महाजन गल्ली, यावल या तरूणाने दि. १७ रात्री ८ ते ८ .३० वाजेच्या सुमारास आपल्या महाजन गल्लीतील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले.  तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्यावर अक्षय यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यास रात्री तात्काळ उपचारासाठी भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अक्षय करांडे हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत सॉप्टवेअर अभियंता म्हणून नोकरीस होता. या तरूणाने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथे ट्रामा सेन्टर मध्ये करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news