

जळगांव : पुढारी वृत्तसेवा; भुसावळ नगर परिषदेच्या हद्दीमधील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसापासून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये हो किंवा नाही याचे युद्ध सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी 11 वाजेला अकरा वाजेला प्रांत अधिकारी व मुख्य अधिकारी उपमुख्य अधिकारी अग्निशामक दल अधिकारी आस्थापना प्रमुख कार्यालय अधीक्षक पोलीस कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी या 150 जणांच्या उपस्थित मध्ये अतिक्रमणावर हातोडा बसला. (Jalgaon News)
भुसावळ नगर परिषदेच्या न्यायालय परिसर डी एस हायस्कूल परिसर यावल रोड जामनेर रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून भुसावळ शहरांमध्ये अतिक्रमण निघणार यासाठी भुसावळ नगर परिषदेच्या वतीने जाहीर सूचना देण्यात येत होत्या त्यामुळे सणासुदीला अतिक्रमण काढल्यास लोड गाडीवर किंवा रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना चिंता लागलेली होती. या वादामध्ये आमदार संजय सावकार यांनी पुढे घेऊन कोणतेही अतिक्रमण काढले जाणार नाही असे सांगितले, त्यानंतर पुन्हा प्रशासनाने बुधवारी अतिक्रमण काढण्यास गुरुवारपासून प्रारंभ होईल अशी जाहीर सूचना शहरात करून टाकली. अकरा वाजेला प्रशासकीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्य अधिकारी लोकेश ढाके, आस्थापना प्रमुख वैभव पवार कार्यालय अधीक्षक प्रवेश शेख पाणीपुरवठा अभियंता जितेंद्र पाटील, सतिश देशमुख, अग्निशामक दलाधिकारी विवेक माकोडे , सफाई कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी दोन जेसेबी दोन ट्रॅक्टर असा पूर्ण दीडशे जणांचा स्टाफ अतिक्रमण काढण्यासाठी सकाळी 11 वाजेपासून रस्त्यावर उतरला होता.
यावल रोडवरील डॉक्टर निलेश महाजन यांच्या दवाखान्यासमोरून अतिक्रमणावर पहिला हातोडा बसला व त्यानंतर सेंट्रलायसिस व तेथील पुढे न्यायालयाच्या भिंतीच्या बाजूला असलेले अतिक्रमण तसेच नगरपालिका व्यापारी संकुलन समोरील अतिक्रमण व तेही तोडण्यात आले. यानंतर काही काळासाठी न्यायालयाच्या बाहेरील अतिक्रमण काढताना राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्यामध्ये अतिक्रमण काढण्यावरून बोलाचारी झाली. मात्र मुख्याधिकारी यांनी तुम्ही पाच सूत्र अवलंबा मी तुम्हाला व्यवसाय करण्यास मुभा देईल असे सांगून या विषयाला बगल दिली. यानंतर ऑफिस रोड वरील अतिक्रमण असलेले दुकाने तोडण्यात आली.
हेही वाचा :