Jalgaon Municipal Election | जळगाव महापालिका निवडणूक : ५१६ केंद्रांवर ‘लोकशाहीचा उत्सव’; प्रशासन ‘वॉर मोड’वर!

​ Jalgaon News | साहित्याची जुळवाजुळव; शहरात २ ‘पिंक’ तर १२ ‘आदर्श’ मतदान केंद्रे; १३५ वाहनांचा ताफा तैनात ​
JMC Election News
Jalgaon Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

JMC Election News

जळगाव: जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे ‘वॉर मोड’वर आली आहे. शहरात एकूण ५१६ मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. बुधवारी (दि. १४) सकाळी ८ वाजेपासूनच एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून ईव्हीएम आणि साहित्याचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

यंत्रणा सज्ज: ५२ क्षेत्रीय समन्वयक आणि पोलिसांची करडी नजर

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडावी, यासाठी ५२ क्षेत्रीय समन्वयक (झोनल ऑफिसर) आणि ७२ मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त राहावा, यासाठी ५१६ पोलीस कर्मचाऱ्यांची ‘खाकी’ तैनात असणार आहे. याशिवाय केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि शिपाई अशा कर्मचाऱ्यांची फौज मतदानासाठी सज्ज झाली आहे.

JMC Election News
Jalgaon Municipal Election | जळगाव महापालिकेत ‘नातेगोते’ अन् ‘निष्ठे’चा खेळ; तीन पिढ्या रिंगणात!

‘पिंक’ आणि ‘आदर्श’ केंद्रांचे आकर्षण

यंदाच्या निवडणुकीत प्रशासनाने मतदारांसाठी विशेष सोयी केल्या आहेत.

​पिंक केंद्रे: महिला मतदारांसाठी खास २ ‘पिंक’ मतदान केंद्रे.

​दिव्यांग केंद्र: दिव्यांगांसाठी १ स्वतंत्र मतदान केंद्र.

​आदर्श केंद्रे: शहराच्या सौंदर्यात भर घालणारी १२ ‘आदर्श मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत.

​१३५ वाहनांचा ताफा दिमतीला

कर्मचारी आणि मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने तब्बल १३५ वाहने अधिग्रहित केली आहेत. यात एसटी महामंडळाच्या बसेस, मिनी बसेससह १६ क्रुझर, ५२ टेम्पो ट्रॅव्हलर आणि २० बोलेरो गाड्यांचा समावेश आहे. हा वाहनांचा ताफा प्रशासनाच्या दिमतीला हजर झाला आहे.

JMC Election News
Jalgaon Municipal Election: जळगाव मनपा निवडणूक: भाजपचा श्रीगणेशा! उज्वला बेंडाळे बिनविरोध

बुधवारपासून सकाळपासून लगबग

मतदानासाठी आवश्यक असलेली मतदान यंत्रे (EVM) आणि कंट्रोल युनिटचे वाटप आज सकाळी ८ वाजता सुरू झाले. एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन क्रमांक १४ आणि १६ मधून हे साहित्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल. त्यामुळे उद्या सकाळपासूनच एमआयडीसीत निवडणूक कर्मचाऱ्यांची लगबग पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news