Jalgaon Municipal Election Mahayuti: जळगाव महापालिकेत महायुतीचाच झेंडा; ना. गिरीश महाजन यांची घोषणा
जळगाव : जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुती च्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार आहे असे वक्तव्य आज नामदार गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केले. यावेळी प्रथम त्यांनी इच्छुक उमेदवारांशी बोलताना सांगितले की कोणाला तिकीट मिळेल भाजपासाठी सर्वांनी काम करायचे आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून भाजपामध्ये सर्वात मोठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू झालेली आहे जळगाव महानगरपालिकेमध्ये 75 जागा असून जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट हे निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे अद्यापही ठरलेले नाही रविवारी दुपारपर्यंत यावर निर्णय होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी जाहीर केले.
माध्यमांशी बोलण्यापूर्वी गिरीश महाजन यांनी इच्छुकांशी संवाद साधला व यावेळी कोणाला तिकीट मिळेल कोणाला तिकीट मिळणार नाही मात्र कोणीही नाराज न होता त्यांनी भाजपासाठी काम करायचे आहे भविष्यात त्याला यापेक्षाही मोठी संधी मिळू शकते असे वक्तव्य त्यांनी केले.
महायुतीच्या जागांचा फॉर्मुला जरी ठरलेला नसला तरी सर्वाधिक जागा या भाजपाच्या कोट्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले त्यानंतर शिवसेनेला जागांचा सर्वाधिक मिळणार असून त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा मिळणार आहे
तसेच या महायुतीमध्ये असेही ठरवण्यात आलेले आहे की ज्यांनी भाजपाला रामराम करून दुसऱ्या पक्षात गेलेले आहे त्या उमेदवारांना संधी मिळू नये यावरही चर्चा होणार आहे किंवा त्यांना संधी देऊ नये तो कोणत्याही पक्षातला असो भाजपातला असो शिवसेनेतला असो किंवा राष्ट्रवादीतला असो त्यामुळे इच्छुकांना हा पक्षाला रामराम करून दुसऱ्या पक्षात जाता येणार नाही हे तर निश्चित झालेले आहे

