Jalgaon Municipal Election: जळगाव मनपा निवडणूक: चौथ्या दिवशी अर्जांचा पाऊस, इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

उमेदवारी निश्चित नसतानाही २४ जण मैदानात; भाजप-शिवसेनेत सर्वाधिक हालचाल
Jalgaon Municipal Election Result
Jalgaon Municipal Election ResultPudhari
Published on
Updated on

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. गुरुवारी, चौथ्या दिवशी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष अशा एकूण २४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. विशेष म्हणजे, पक्षाची अधिकृत उमेदवारी (एबी फॉर्म) अद्याप गुलदस्त्यात असतानाही, अनेक दिग्गजांनी अर्ज भरून आपला दावा ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Jalgaon Municipal Election Result
Railway Service New Rules : ‘कन्फर्म’ स्टेटस : 30 डिसेंबरपासून नवीन नियम लागू; पहा वेळापत्रक

२५ तारखेला सार्वजनिक सुटी असल्याने नामनिर्देशन पत्रांची एकूण संख्या आता २५ वर पोहोचली आहे. चौथ्या दिवशी अर्ज भरणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या सत्ताधारी पक्षांमधील इच्छुकांची मोठी संख्या आहे.

Jalgaon Municipal Election Result
Jalgaon Election News : जळगाव मनपा निवडणूक; तिसऱ्या दिवशी उमेदवारी अर्जांचा श्रीगणेशा

पक्षांकडील अर्जांची आकडेवारी:

भाजप: १२ अर्ज

शिवसेना (शिंदे गट): ६ अर्ज

काँग्रेस: १ अर्ज

अपक्ष: ५ अर्ज

Jalgaon Municipal Election Result
Jalgaon : सुवर्णनगरीत दरवाढीचा भडका : अवघ्या 24 तासांत चांदी ८ हजारांनी महागली, सोनेही लखाखले

हे आहेत प्रमुख उमेदवार:

नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अण्णा भापसे, भाजपचे माजी महानगराध्यक्ष गौरव ढेकळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेडाळे, मनोज दयाराम चौधरी, प्रेमकुमार बालानी (भाजप/अपक्ष), विश्वनाथ खडके, साधना रोटे आणि विजय वानखेडे या प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहे.

Jalgaon Municipal Election Result
Jalgaon Crime : भयानक वास्तव ! चौथीही मुलगीच जन्मली; विकृत बापाने नवजात बाळाला संपवलं...

पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही, तरीही 'आधी अर्ज, मग उमेदवारी' असे धोरण इच्छुकांनी अवलंबल्याचे दिसून येत आहे. आता चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात असून, दाखल झालेल्या अर्जांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक 1,7,17मध्ये एक प्रभाग क्रमांक 2, 18,दोन, प्रभाग क्रमांक 12 मध्ये 3, प्रभाग क्रमांक 13 15 मध्ये प्रत्येकी चार, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 6 असे एकूण 24 अर्ज दाखल झालेले तर 235 अर्जांची विक्री झालेली आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news