Jalgaon Municipal Election 2026: Police force in action mode; strong security deployed for 75 seats.
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
आगामी जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या काळात शांतता राहावी आणि मतदारांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला आहे.
निवडणुकीचे नियोजन एका दृष्टिक्षेपात
जळगाव शहरातील १९ प्रभागांमधील एकूण ७५ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. प्रशासनाने मतदानासाठी जय्यत तयारी केली असून त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
एकूण प्रभाग : १९ एकूण नगरसेवक पदे : ७५ मतदान केंद्रे : १६९ एकूण बुथ : ५१६
गुन्हेगारांवर कडक कारवाई आणि शस्त्र जप्ती निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला आहे. शस्त्र जप्ती: सुरक्षिततेचा उपाय म्हणून परवानाधारक शस्त्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली असून, आतापर्यंत २५१ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हद्दपारीची कारवाई: शहरातील उपद्रवी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ९८ इसमांना हद्दपार करण्याचे प्रस्तावित आहे.
यापैकी ७८ जणांचे प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. नोटीस बजावणी: १५० जणांना नोटीस देण्याचे नियोजन असून, आतापर्यंत ६१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. असा असेल 'खाकी'चा कडेकोट बंदोबस्त निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी हजारो पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस उपअधीक्षक ०९ पोलीस निरीक्षक २१ सपोनि / पोलीस उपनिरीक्षक ६० पुरुष पोलीस अंमलदार १०७० महिला पोलीस अंमलदार १३७ होमगार्ड्स ११०० एसआरपीएफ (SRPF) कंपनी ०१ दंगा नियंत्रण पथके ०८ शीघ्र प्रतिसाद दल (QRT) ०२ शहरात संवेदनक्षम भागांवर विशेष लक्ष दिले जाणार असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.